धानोरा /भाविक करमनकर
स्थानिक धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागात द्वारा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉपंकज चव्हाण सर यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी डॉ किरमिरे डॉ जंबेवार डॉ वाघ डॉ चुधरी डॉ झाडे डॉ लांजेवार डॉ पठाडे प्रा पुण्यप्रेडीवार प्रा वाळके डॉ धवणकर प्रा तोंडेरे प्रा भैसारे प्रा करमणकर प्रा बनसोड यांनी पुष्प अर्पण करून विनम्र आदरांजली वाहिली.
यावेळी सर्व कर्मचारी व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी दोन मिनिटाचे मौन पाळून सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली .
संचालन प्राध्यापक ज्ञानेश बनसोड तर आभार प्रदर्शन डॉ पठाडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी मोलाचे सहकार्य केले