रमेश बामनकर /अहेरी प्रतिनिधी
अहेरी :- शेरू बालवसिंग मिड्डाइ वय ३८ हे काही कामानिमित्त अहेरी वरून नागपेपल्लीला येत असताना दुचाकीच्या असंतुलनान्वये ते खाली पडले, यामुळे सदर इसम गंभीर जखमी झाले.त्या इसमास उपचारासाठी आजू बाजूच्या परिसरातील लोकांनी स्वराज्य फाऊंडेशनचा पदाधिकारीनां संपर्क केला.संपर्क करताच स्वराज्य फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्वराज्य फाउंडेशनची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले व नागेपल्ली येथील सेवा सदन हॉस्पिटल येथे उपचारासाठी अपघातग्रस्त व्यक्तीला तात्काळ दाखल करण्यात आले.
स्वराज्य फाउंडेशन व लाडका गणेश मंडळ या परिसराचे दैवत म्हणून कार्यरत असून फाउंडेशन मुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचले आहेत.अहेरी विभागातील रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नादुरुस्त रस्त्यामुळे निष्पाप नागरिकांना आपल जिव गमवावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीचा मागणी नागरिक करीत आहेत.