राष्ट्रीय सेवा योजना वतीने युवा भारत पर्यावरणपूरक दिवाळी अभियान…

 

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

 चिमूर /- गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर राष्ट्रीय सेवा योजना वतीने युवा भारत अंतर्गत पर्यावरणपूरक दिवाळी अभियान अंतर्गत कार्यक्रम साजरे केले.

       प्रसंगी रासेयो स्वयंसेवकानी परिसर स्वच्छता,चिमूर बसस्थानकात जनजागृती, वाहतूक नियमन दिवाळीत प्रदुषण नियंत्रण ठेवण्यासाठी प्रदुषण मुक्त फटाके विकण्याचे आवहान प्रत्यक्ष फटाके दुकानदारास केले. 

       माय भारत अभियानाअंतर्गत रासेयो स्वयंसेवकानी शासनपुरस्कृत पर्यावरणपूरक उपक्रम राबविल्यामूळे समाजात निश्चितच प्रदुषणाविषयी जागृती होईल अशी ग्वाही प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल यांनी दिली. 

       या कार्यक्रमाचे आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.प्रफुल राजुरवाडे व डॉ. नितिन कत्रोजवार यांनी केले.प्रा. आशुतोष पोपटे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

     रासेयो स्वयंसेवकानी उदंड प्रतिसाद दिला.