दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे कार्य अनेक वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून प्रशालेतील ‘विद्यार्थी सहाय्यक समितीच्या’ अंतर्गत ‘एक हात मदतीचा’ या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून स्नेहवण अनाथाश्रम व नैसर्गिक शिक्षा संशोधन व प्रशिक्षण संस्था यांना तब्बल 80 हजार रुपयाच्या किराणा मालाची मदत करण्यात आली. तसेच प्रशालेत स्वच्छता महीला कर्मचार्यांना दीपावली निमित्त साडी भेट देण्यात आली.
याप्रसंगी स्नेहवन अनाथाश्रमाचे बाबाराव देशमाने व नैसर्गिक शिक्षा संशोधन अनाथाश्रमाचे अल्हाद टपाले व त्यांचे सहकारी तसेच संस्थेचे सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ.दीपक पाटील, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
या कार्यासाठी विद्यार्थी सहायक समितीच्या वतीने प्रज्ञा यादव, सूर्यकांत खुडे, रामदास वहिले यांनी मोलाचे सहकार्य केले. संत ज्ञानोबांच्या ‘दुरितांचे तिमिर जावो’ व संत तुकोबांच्या ‘जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले’ या उक्तीप्रमाणे संत विचारास अनुसरून ही संस्था काम करीत असल्याचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले व उपस्थित मान्यवरांचे प्रदीप काळे यांनी आभार व्यक्त केले.