पिंपरी बुद्रुक येथील कै.आदित्य देवशेटे कुटुंबाच्या सांत्वन भेटीला माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती… — कैलासवासी आदित्य देवशेटे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन दुःखही व्यक्त केले…

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

         पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील कैलासवासी आदित्य मोहन देवशेटे यांचे झालेले दुःखद निधनाची खबर कळताच सोमवारी दिनांक 28 रोजी संध्याकाळी सात वाजता गोरगरिबांचा जाणता राजा माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी उपस्थितीत राहून पिंपरी बुद्रुक येथील देवशेटे कुटुंबांचे सांत्वन केले. 

           सांत्वन भेटी प्रसंगी दत्तात्रय मामा भरणे बोलत असताना म्हणाले की, देवशेटे कुटुंब हा माझा परिवार समजून मी आपल्या दुःखामध्ये सामील आसून इथून पाठीमागे ही आणि इथुन पुढेही गोरगरिबांच्या सुखदुःखासाठी सदैव प्रयत्नशील राहणारच आहे,

          एवढी मोठी इंदापूर विधानसभेची धातपळ असून सुद्धा एखाद्यावर पडलेल्या दुःखाच्या संकटात सामील होन ही माझी जबाबदारी आहे, हीच मला परमेश्वराने दिलेली शिकवण आहे, देवशेटे कुटुंबाच्या सांत्वन भेटी प्रसंगी माजी राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांचे उद्गार..

         यावेळी तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले सर, साखर कारखान्याचे संचालक श्रीकांत बोडके,सरपंच सुदर्शन बोडके, उपसरपंच संतोष सुतार, माजी उपसरपंच पांडुरंग बोडके, यांनीही उपस्थितीत राहून दिवशेटे कुटुंबाचे सांत्वन केले.