
रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे व माजी आमदार मितेशजी भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत कोराडी,नागपूर येथील निवासस्थानी चिमूर विधानसभा मतदारसंघातील माना समाजाचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमारजी गजबे यांच्यासमवेत त्यांचे सुपुत्र आशिषभाऊ गजबे यांचा स्वगृही भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश झाला आहे…
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे व माजी आमदार मितेशजी भांगडीया यांनी डॉ.रमेशकुमारजी गजबे व आशिषभाऊ गजबे यांचे पुष्पगुच्छ भेट देऊन पक्षात सहर्ष स्वागत केले तथा अभिनंदन करीत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजयुमो प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा युवा नेते संकेतभाऊ बावनकुळे,भाजपा चिमूर तालूकाध्यक्ष राजू पाटील झाडे व विविध भाजपा नेते,पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.