माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे यांचा पक्ष राजीनामा घुमतोय सोशल मीडियावर..

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

        माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे हे वंचित बहुजन आघाडीचे पुर्व विदर्भ समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळत होते.

            महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक कार्यक्रम कार्यकाळात डॉ.रमेशकुमार गजबे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणे अचंबित करणारे आहे आणि असंमजस निर्माण करणारे आहे.

        वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यावर पुर्व विदर्भाची जबाबदारी सोपवून अघाड विश्वास दाखवला होता.

          डॉ.रमेशकुमार गजबे यांनी वंचितला अपेक्षित यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले असावेत.पण,त्यांना संघटन कौशल्य जमले नसल्याचे त्यांच्या पक्ष राजीनामावरुन स्पष्ट आहे.

          पुर्व विदर्भ समन्वयक सह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने,ते आता चिमूर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे काम करणार नाही.

       पण,ते विधानसभा निवडणुक काळात शांत बसणार की भाजपा किंवा काँग्रेस उमेदवाराला मदत करण्यासाठी सक्रिय होणार? यावरून त्यांच्या राजीनाम्याचे अस्त्र समजेल.