“आम्ही ( भारतीय जनता आणि विशेष करुन सुशिक्षित पिढी ) तुम्ही सांगितल्या प्रमाणे वागू शकत नाही.कारण आमचा कधीही न संपणारा स्वार्थ तुमचे शब्द कानी पडू देत नाही. त्याबद्दल आम्हाला क्षमा करा…
सर्व क्षेत्रात जागतिक मानवी क्रांती करणारे तुम्ही ठरलात,त्याचा लाभ आणि महत्व इतर देशांनी घेऊन तुम्हाला जागतिक कीर्ती मिळवून दिली.आम्ही मात्र तुम्हाला तुमच्या आदेशाचे पालन आचरणातून सिद्ध न करता स्मारकात बंदिस्त करुन मोकळे झालो.
तथागत भगवान बुद्धाच्या काळात 99% टक्के भिखू संघ अरहंतप्राप्त होता….!
आज एकही नाही……
म्हणूनच की काय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आम्हाला दिक्षा देताना नागपूर येथे मी संघाला शरण जाणार नाही म्हणून हट्ट धरला होता, याच्या कारणाचा अनुभव येतोय.
ज्या भगवान बुद्धानी सहा आठवडे पोटात अन्नाचा कणही न टाकता शरीराला यातना ज्ञानप्राप्तीसाठी दिल्या. त्याच धम्मातील वर्षावासाच्या सांगता समारोपासाठी आम्हाला भोजनासाठी काय काय करावे यावरून भिखू संघ आणि उपासकामध्ये वाद झडतात….
उलट त्या दिवशी भिखू संघालाच भोजनदान व चिवरदान देऊन ( पैश्याचे पाकेट न देता ) उपासकांनी त्या दिवशी अन्नाचा एकही कण पोटात न टाकता केवळ धम्मदेसना ग्रहण करावी ( धम्मदेसनेमध्ये केवळ दानपारमिताच नसावी ).
परंतू आजचे (2024चे )आम्ही उपासक आणि भिखू संघ…..!
अशा मानसिकतेत असलेला आमचा धम्म असेल तर,तथागत भगवान बुद्धाच्या काळातील 100% धम्माचे संशोधन करुन आम्ही ( भिखू संघ आणि उपासक ) तिथपर्यंत कसे पोहचू…..?
सावित्रीबाई आणि म. फुले आपण या देशात शिक्षण क्रांतीची सुरुवात केली. परंतू आम्ही मात्र त्या शिक्षणातून विज्ञानवादी,विवेकवादी, मानवतावादी प्रतिभावाण न बनता पुन्हा आम्ही ( भारतीय जनता )मनुवाद्यांचे गुलाम बनण्यासाठी स्वार्थासाठी शिक्षण घेतल्यामुळे घेऊन एका पायावर तयार झालो..
तेंव्हा आम्हाला क्षमा करा..
संत कबीर आणि संत गाडगे बाबा,तुम्ही कोणत्याही शाळेतून महाविद्यालयातून पदवी न घेता आम्हाला श्रद्धा शिकविली,परंतू आम्ही मात्र त्याच श्रद्धेला आंधळे करुन मनुवाद्यांचे गुलाम होणार आहोत..,…
तेंव्हा तुम्ही आम्हाला क्षमा करा…..
डॉ.बाबासाहेब आंबेडकर तुम्ही आम्हाला ( भारतीय जनतेला ) सर्व काही दिले…..
अक्षरशा गुलामीच्या काळोखातून आमच्या गचांडीला पकडून बाहेर काढून “माणूस ” बनविले.जगण्याचा मार्ग म्हणून धम्माच्या पदरात आम्हाला टाकले. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी संविधान दिले………
परंतू,आम्ही त्याचेही जागृतीतून रक्षण करण्यात 75 वर्षात अपयशी ठरलो आणि मनुवाद्याची गुलामी स्वीकारण्यासाठी तयार झालो…..
आम्हाला क्षमा करा….
संविधानातील मूलभूत असलेला हक्क,जो लोकशाही आणि संविधानाचे म्हणजेच आमच्या सर्व हक्काचे रक्षण करणारा….
मतदानाचा हक्क…
व्यवस्थेने हिरावून घेतला…..
जगात कुठेही मतदान EVM वर न घेता बॅलेट पेपरवर होत असतांना सुद्धा…….
व्यवस्थेने ( मुख्य निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय ) EVM च्या माध्यमातून मनुवाद लादण्याचा निग्रह केलेला असतांना……
आम्ही त्याच्या विरोधात रस्त्यावर न उतरता षंढ होऊन मनूवाद्यांची गुलामीचे स्वागत करायला तयार आहोत…..
त्याबद्दल…….
महापुरुषांनो तुम्ही आम्हाला क्षमा करा…..
जागृतीचा लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरकर,7875452689..