ऋषी सहारे
संपादक
तालुका मुख्यालयापासून अंदाजे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या (कोरची) सोहले नजीक छत्तीसगड येथून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक CG 13 AF 6527 ने दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान घडली.
मृतक महेश कोवाची (22) हा कोरची तालुक्यातील शिकारीटोला येथील रहिवासी असून महेश आपल्या दुचाकी क्रमांक CG 08 AF 5878 ने कोरची येथून कम्प्युटर टायपिंगची क्लास आटपवून आपल्या गावाकडे जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली धडक इतकी जोरदार होती की मृतकाचे शरीर रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतावर फेकले गेले तसेच दुचाकी सुद्धा पूर्ण चेंदामेंदा झाली असून ट्रक सुद्धा रस्त्याच्या खाली असलेल्या शेतावर जाऊन उतरले. मिळालेल्या माहितीनुसार ट्रक चालक हा मध्यधुंद अवस्थेत संपूर्ण रस्त्यावर गाडी चालवत होता. घटना घडताच ट्रक चालकांनी ट्रक सोडून पळ काढला.
सुरजागड लोह प्रकल्पातील ट्रक असल्याची माहिती
धडक देणारा ट्रक हा सुरजागड लोहखाण प्रकल्पातील असून लोहखाणीतील ट्रक हे कोरची मार्गाने जात असून मध्यधुंद अवस्थेत असलेले ट्रक चालक हे भरधाव वेगाने सुसाटपणे या रस्त्यावर ट्रक चालवीत असतात. सुरजागड प्रकल्पातील या ट्रकमुळे तालुक्यात पहिली जीवितहानी झाली असून काही दिवसानंतर झेंडेपार येथील सुद्धा लोह प्रकल्प सुरू होणार असून त्यावेळेस किती लोकांचे बळी जाईल याचे विचार न केलेलेच बरे…. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.