प्रदीप रामटेके
संपादकीय
(थोडक्यात)
[ —“समता,स्वातंत्र्य,न्याय,बंधुत्व,अधिकार,हक्क,परिवर्तनवादी व्यवस्था,चारित्र्य,निती,नियम, लोकशाही अंतर्गत राज्यसत्ता-प्रशासन,शिक्षणाचे व रुपयाचे महत्त्व,शेतकऱ्यांचे व कामगारांचे हित, ओबीसी-एससी-एसटी-विमुक्त भटक्या जमाती व जाती-इतर मागासवर्गीय,अल्पसंख्याक समाजातील नागरिकांची सर्व सत्तेतील व सर्व प्रशासनातील भागीदारी,यासाठी पोटतिडकीने संघर्षमय यशस्वी क्रांती घडवून आणणारे भारतीय घटनेचे शिल्पकार तथा बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे लोकांच्या डोक्यात व हृदयातच निरंतर असावे!,—]
वर्णव्यवस्था अंतर्गत जहाल अशा अन्याय व अत्याचारग्रस्त जातीभेदाच्या कालखंडात,”भारत देशातील तमाम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व कल्याणासाठी,”खडतर जीवन प्रवासाला नेहमी संघर्षमय तथा गतिशील ठेवताना,”चारित्र्य संपन्नतेला,महाप्रज्ञासुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तसूभरही ढळू दिले नाही,”हे वास्तव,चिकित्सक तथा तर्कशुद्ध विचारान्वये आजच्या घडीला लक्षात घेतले तर जविख्यात थोर समाजसुधारक,जगविख्यात प्रकांड पंडित,बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो भारताच्या चलनावर नसायला पाहिजे हे माझे वैयक्तिक आणि स्पष्ट मत आहे.
भारतीय चलन भारत देशातील सर्व नागरिकांसाठी महत्वाचे आहे व भारतीय चलनाचा आदर भारत देशातील सर्व नागरिकांना आहे हे निर्विवाद सत्य आहे.
मात्र,दररोज चारित्र्याचे हनन करणारे भारत देशातील अवैध व वैध व्यवसाय अभ्यासलेत किंवा अशा व्यवसायाचा विचार केला तर भारतीय संविधान निर्मात्याला चलनावर आणणे देशाच्या चारित्र्य संपन्न सार्वभौमत्वासाठी हितवाहक ठरणार नाही असे चिन्हे आहेत.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे,”चारित्र्य संपन्नतेला अनुसरून या देशातील तमाम नागरिकांचे प्रज्ञान्वये उच्चतम कोटीचे आचारण असल्याने,भारत देशातील नागरिकांच्या शुध्द आचरणाला धक्का पोहोचणार नाही याची खबरदारी सर्वांनी घेणे आवश्यक आहे.
तद्वतच क्रांतीसुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे १९ व्या शतकातंर्गत सामाजिक-राजकीय-शैक्षणिक-औधोगिक-धार्मीक-न्यायीक-तथासार्वभौमत्व व इतर महत्वपूर्ण,क्रांतीचे दिर्घकालीन यशस्वी प्रेरणास्रोत व प्रेरणास्थान ठरले आहेत.तद्वतच भारतीय संविधान निर्माता या सदरान्वये ते भारत देशातील तमाम नागरिकांचे कायद्यान्वये संरक्षक व रक्षक ठरले आहेत.म्हणूनच त्यांचे स्थान भारत देशातील नागरिकांच्या मनात व ह्रदयात निरंतर असले पाहिजे.
बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ओजस्वी असे महा प्रेरणास्रोत विचार,त्यांची कणखर प्रज्ञामय वाणी,भारत देशातील तमाम नागरिकांना सदैव जिवंत ठेवणारा गतिशील व परिवर्तनवादी जनहितार्थ असा विविध स्तरांवरील न्यायीक संघर्ष,हाच भारतीय नागरिकांसाठी महत्वाचा दिशादर्शक असल्याने,युगप्रवर्तक तथा युगपुरुष डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महाकार्याला कोणत्याही कारणास्तव धक्का लागता कामा नये,हे आपण बारकाईने लक्षात घेतले पाहिजे.
चलनी नोटांवर असणाऱ्या फोटो पेक्षा कितीतरी करोडो पटीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महा तेजोमय चारित्र्य संपन्न शिल व त्यांची विविध स्तरांवरील महप्रज्ञामय विशाल परिवर्तनवादी यशस्वी क्रांती,त्यांचा सर्वांप्रती हृदयस्पर्शी असा मैत्रीभाव अनन्यसाधारण आहे,याची जाणीव आपण सर्वांनी तेवत ठेवली पाहिजे.
भारतीय चलनातंर्गत बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटेचे,”चल रुपये किंवा चल नाने,चारित्र्याचे हनन करणाऱ्या अशा कुठल्याही व्यवसायात चल व्हायला नको यासाठी,आपण सतर्क व जागरूक राहिले पाहिजे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो रुपयांवर येवू नये यासाठी विरोध केला पाहिजे…कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे चारित्र्य आहेत हे समजून घेतले पाहिजे..