“अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस” मोफत सभा खरंच करते मनुष्यास मद्यमुक्त :- सरपंच मोदी… — निर्णय समुह सौंदडचा ६ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न… 

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

सडक/अर्जूनी / साकोली : अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस आत्मसमर्पण आंतरसमुह (भंडारा गोंदिया गडचिरोली) अंतर्गत निर्णय समुह सौंदड/रेल्वे ता. सडक/अर्जुनी जि. गोंदिया ६’ वा वर्धापन दिन सोहळा (रवि. २९ सप्टें.ला ) संपन्न झाला.

           यात आपल्या अध्यक्षीय भाषणात सरपंच हर्ष विनोदकूमार मोदी यांनी “अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस” या निःशुल्क सभेचा लाभ खरंच मद्यसक्त व्यक्तींच्या मनावर परिणाम करीत तो मनुष्य या विनामुल्य सभेत एकमेकांचे मद्यसक्त जीवनातील कटू अनुभव कथन ऐकून हळूहळू दारू पासून कायमचे मद्यमुक्त होतात असे प्रतिपादन केले. 

       जिल्हा परिषद हायस्कूल सौंदड/रेल्वे प्रांगणात आयोजित अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस ( आत्मसमर्पण आंतरसमुह भंडारा गोंदिया गडचिरोली ) अंतर्गत निर्णय समुह सौंदड/रेल्वे. चा ६ व्या वर्धापन दिन सोहळ्याला मंचावर अध्यक्ष सरपंच हर्ष विनोदकूमार मोदी, ग्रामीण रूग्णालय सौंदड वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्यश्री शिंदे, जि. प. स. सदस्या निशा तोडासे, जि. प. हायस्कूल मुख्याध्यापक एस. एन. भिमटे आदी मंचावर होते. या ६ व्या वर्धापन दिनी “मद्यपाश एक जीवघेणा आजार” या विषयावर अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस लाखांदूर, गोंदिया, आमगांव, ब्रम्हपुरी, देसाईगंज, भंडारा, अर्जूनी मोरगाव, साकोली येथील एए बांधवांनी आपल्या मद्यसक्त जीवनातील कटू, अपघातमय, परीवार कलह, आर्थिक नुकसान असे विविध आठवणीतले अनुभव कथन केले. आणि जेव्हापासून अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस या अगदी निःशुल्क सभेचा साथ मिळाला व आम्ही कायमचे मद्यमुक्त झालो असे असंख्य आत्मनुभव कथन सांगितले.

            अध्यक्षीय सरपंच हर्ष विनोदकूमार मोदी यांनी सांगितले की, सौंदड रेल्वे येथील बहुसंख्य मद्यपी आज रविवारी होणाऱ्या नियमित सभेमुळे मद्यमुक्त होऊन आज आपल्या परीवारात सुंदर जीवन जगत आहेत असे कथन केले.

           या एकदिवसीय कार्यशाळेत आयोजकांनी आवाहन केले की, ज्या ज्या कुटुंबात अथवा मित्र मंडळांमध्ये ग्रासित मद्य पिण्याची अहोरात्र सवय ज्यांना असल्यास आमच्या अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस नियमित सभेचा निःशुल्क लाभ घ्यावा असे आवाहन केले. 

      सदर वर्धापन दिन व एकदिवसीय कार्यशाळेत अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस आत्मसमर्पण आंतरसमुहातील सर्व निर्णय समुह सौंदड, युनिटी समुह साकोली, मानवता समुह लाखांदूर, निर्माण समुह बाम्हणी, नई दिशा समुह अर्जूनी मोरगाव, एए समुह चारगांव/सुंदरी येथील सर्व बांधवांनी सहकार्य केले. येथे संचालन युनिटी समुह बांधवांनी केले तर आभार निर्णय समुह सौंदड बांधवांनी मानले.

             याप्रसंगी येथे दोनशेहून अधिक बांधव आणि ॲल अनॉन भगिनी उपस्थित झाले होते.