पदविधर शिक्षक राजकुमार गेडाम यांनी अनाथ भावंडाना घेतले दत्तक…

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

चिमूर – 

            देवांश विदेश मेश्राम वर्ग 4 था व आराध्या विदेश मेश्राम वर्ग 2 मध्ये शिकत आहेत ही दोन्ही भावंडं आई वडीलांच्या मृत्युने पोरके ( अनाथ ) झाले आहेत ते पिंपळनेरी येथे आजी आजोबा किरण व सुभाष टेंभुर्णे यांकडे राहत असल्याची माहिती पदविधर शिक्षक राजकुमार गेडाम यांना मिळाली असता त्यांनी दोन्ही भावंडांना दत्तक घेतले आहे.

         पदविधर शिक्षक राजकुमार गेडाम हे चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जि प उच्च प्राथ.शाळा खांबाडा येथे शिक्षक आहेत. नेहमी ते कोणत्याही सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. यावर्षी सुद्धा त्यांनी खांबाडा शाळेच्या 4 विद्यार्थ्यांना दत्तक घेतले होते. अनाथ बालकांना बालसंगोपन योजने अंतर्गत आर्थिक मदत बालसंगोपन विकास समिती चंद्रपूर कडून मिळत असल्याची माहिती राजकुमार गेडाम याना असल्याने या दोन्ही अनाथ भावंडांचे अर्ज सुध्दा तयार करून घेतले. शाळेतील विद्यार्थ्यांना नेहमीच आर्थिक मदत करून विद्यार्थ्यांना लेखन साहित्य सुध्दा देत असतात. त्यांचे राष्ट्रीय कार्य सुध्दा चांगले आहे. कोविळ योद्धा म्हणून ,जनगणना,प्लस पोलिओ अभियान, कुटुंब कल्याण अशा राष्ट्रीय कार्यक्रमात त्यांनी काम केले आहे. शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना बचत करता यावी यासाठी बचत बँक सुध्दा तयार करण्यात आली आहे. हे त्यांचे कार्य शासन प्रशासनाला लाजवणारे आहे. सामाजिक कार्याचा हा वसा त्यांचे आजोबा  

डोमा मदगु गेडाम,आई वाच्छाला व हरी गेडाम यांच्या कडून मिळाला आहे.

        त्यांनी केलेल्या कार्याचे कौतूक उपायुक्त नागपूर संघमित्रा ढोके, समद्रपूर प्रभारी गटशिक्षणाधिकारी ललित बारसागडे , विनेश शेवाळे, अरुण गाढे,जयदास सांगोडे, सुरेखा अत्तरगडे, सागर शंभरकर, सुनील चूनारकर, हेमंत हुमने, सुरेश हूमने, हिरालाल बनसोड, विनोद पेंदाम,आनंद टेंभूर्णे, मनोज पाटील, विजय निनावे केंद्रप्रमुख आसिक सुखदेव, राजकुमार अलोणे आणि जयेंद्र राऊत यांनी केले आहे.