कोकलापार तलावाच्या साठवण क्षमतेत वाढीसाठी ४.९५ कोटींचा विकास निधी मंजुर… — विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश – ८१ हेक्टर शेती ओलिताखाली येणार…

      सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

         सावली तालुक्यांतील विरखल चक येथील कोकलापार या शंभर वर्षांपूर्वीच्या मालगुजारी तलावात गोसेखुच्या उजव्या कालव्यामधून पाईपलाईन द्वारे पाणी पोहोचवून सदर तलावाच्या साठवण क्षमतेत वाढ करण्याकरिता शासन स्तरावर राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी सतत पाठपुरावा केला.

           अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून सदर महत्वपूर्ण कामास ४ कोटी ९५ लक्ष निधीस प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.यामुळे शेतकऱ्यांची जवळपास ८१ हेक्टर शेती ओलिताखाली येणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

           सावली तालुक्यात चक विरखल येथे कोकलापार हा शंभर वर्षांपूर्वीचा मालगुजारी तलाव अस्तित्वात आहे. सदर तलावाची पाळीची ४२० मीटर, तलावाचे बुडीत क्षेत्र ११.६६ हेक्टर, निस्तार धारक क्षेत्र ६०.२४, तर गैर निस्तार धारक क्षेत्र २०.०० असे असल्याने एकूण ८१ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित होते.

            माञ तलावाची साठवण क्षमता केवल २४१ स. घ.मी. असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना शेतीकांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होत नव्हते. शेतकऱ्यांच्या या अत्यावश्यक मागणीला न्याय देणे हेतू राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला.

           अखेर या पाठपुरावाला यश प्राप्त झाले असून सदर तलावात गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यातून पिकानुसार टप्प्याटप्प्याने ४०० स.घ.मी. इतके पाणी पाईपलाईन द्वारे सोडण्यात येऊन या तलावाची साठवण क्षमता ६४१.० अशी वाढविण्यासाठी शासन स्तरावरून या महत्त्वपूर्ण व शेतकरी हिताच्या कामाकरिता ४ कोटी ९५ लक्ष २ हजार ३१७ इतक्या मोठ्या विकास निधीच्या अंदाजपत्रकास अखेर प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

           यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी दोन्ही पिके घेण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच तलावाच्या वाढवलेल्या या साठवण क्षमतेमुळे परिसरातील ८१ हेक्टर जमीन ओलीताखाली येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. आपल्या विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या प्रत्येक सुखदुःखात, शेतकरी शेतमजूर, कामगार व सर्वसामान्यांसाठी सदैव प्रयत्नशील असणारे राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना प्रचंड दिलासा मिळाला असून परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे.