प्रितम जनबंधु
संपादक
चंद्रपूर : घुग्घुस येथील मामा कडे यवतमाळ येथून घरगुती गणेशाचे विसर्जना करिता आलेल्या २० वर्षीय भाच्याचे शेंणगावच्या तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सुमित बाळू पोगळे रा यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे.
घुग्घुस वार्ड क्र ६ मध्ये दत्ता मस्के यांच्या कडे आज गणेश विसर्जन होते. या निमित्याने काल बुधवारी भोजनाचा कार्यक्रम होता त्या साठी त्याचा भाचा दोन दिवसांपूर्वी यवतमाळ वरून घुग्घुस ला आला होता. सायंकाळी ५ च्या दरम्यान नजीकच्या शेणगाव तलावात मस्के परिवार गणेश विसर्जना करिता गेले असता तलावातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खात पाण्यात बुडुन मृत्यू झाला.
मृतदेह पाण्याबाहेर काढून घेतल्यानंतर मृतदेह व घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह चंद्रपूर ला शवविच्छेदना साठी पाठविला. त्याच्या मृत्यूने परिवार व गावात हळहळ व्यक्त होत आहे त्याच्या पार्थिवावर यवतमाळ येथील स्वगावी अंत्यविधी करण्यात येणार आहे. अधीक तपास चंद्रपुर पोलिस करीत आहेत.