जय गणेश ग्रुपच्या विसर्जन मिरवणूकीने नागरिकांची मने जिंकली…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक 

पुणे विभागीय 

     आळंदी : गणेश विसर्जन मिरवणूक‌ म्हटलं की ढोल ताशा पथकाचा दणदणाट, बॅन्ड, डिजेचा आवाज पण यासर्व गोष्टींना फाटा देत आळंदी येथील माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली जय गणेश ग्रुप मंडळांच्या स्थापनेपासून आतापर्यंत गणेश विसर्जन मिरवणूकीत विविध समाजप्रबोधनासारख्या महत्वपूर्ण विषयांवर सजीव देखाव्यांच्या माध्यमातून समाजातील प्रश्न विसर्जन मिरवणूकीच्या माध्यमातून समाजापुढे मांडत आहे.

         यावर्षी जय गणेश ग्रुपच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातील संतांनी दिलेली शिकवण विठु माझा लेकुरवाळा या देखाव्यांतून दिली आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत शेख महंमद यांनी सांगितले सर्व धर्म समभाव याविषयावरील विचार समाजापुढे मांडले आहे. विशेष म्हणजे या देखाव्या सर्व पात्र हे मंडाळाचे सभासद साकारत असतात. या देखाव्याला नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे व जय गणेश ग्रुपच्या या कलाकृतीचे भरभरून कौतुक केले आहे.

       महाराष्ट्रसह देशाला संतांच्या विचारांची गरज आहे. संतांनी दिलेला विचारच देशाला तारून नेईल. त्याच विचाराची आज खरी गरज आहे, या उद्देशाने जय गणेश ग्रुपच्या माध्यमातून यंदा विठू माझा लेकुरवाळा हा देखावा सादर केला आहे अशी माहिती ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे व मार्गदर्शक ॲड.नाझीम शेख यांनी सांगितले.