युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार
एकाच जातीतील व नात्यात येत असलेल्या आरोपीने मुलीस गर्भवती केल्याचा प्रकार येवदा पोलिस स्टेशन हद्दीत घडलेला आहे.याप्रकरणी येवदा पोलिसांनी आरोपीस अटक केली असून त्याच्याविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत.
यातील फिर्यादी व आरोपी हे एकाच जातीचे असुन एकमेकांना नात्याने ओळखतात.सन २०२१ च्या उन्हाळयात फिर्यादी ही तिच्या मावशीच्या घरी मौजा रामागड ता.दर्यापुर येथे राहण्याकरीता गेली होती.
त्याच दरम्यान सन २०२१ मध्ये आरोपी शाम सोळंके याने तिला फोन करून रामागड येथील पाण्याच्या तळ्यावर भेटण्याकरीता बोलावले व ती गेली असता त्याने मुलीला म्हटले की,तु मला खुप आवडते आणि तुझ्यावर माझे खुप प्रेम आहे,असे म्हणून त्याने फिर्यादीसोबत शारीरीक संबंध केले.
त्यानंतर सन २०२२ मध्ये काही दिवसांकरीता फिर्यादी ही आजीआजोबा राहत असलेल्या दर्यापूर ते आकोट शेतातील खोपडीत राहण्याकरीता गेली होती.दरम्यान आरोपी शाम सोळंके हा भेटन्याकरीता कोनी नसतांना येत असे व तो फिर्यादीसोबत शारीरीक संबंध ठेवत होता.
दरम्यान दिनांक २४/०९/२०२३ रोजी फिर्यादी हीचे घरी तिला दिवस गेल्याचे समजले.यावरून सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला असता आरोपीला अटक करून
३७६,३७६ कलम(२)(एन)(आय) भा.द.वि.सहकलम ४,६ पोस्को गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास येवदा ठाणेदार अशीच चेचरे,दुय्यम ठाणेदार वसंत शिंदे व पोलीस कर्मचारी करीत आहे.