बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
दिनांक 29
इंदापूर तालुक्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून 50 कोटी 15 लाख रुपये मिळालेल्या विकास कामाचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे व माजी राज्यमंत्री व लोकप्रिय आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामाचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमा प्रसंगी बोलताना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ओबीसी महिलांसाठी 50 टक्के आरक्षण मिळण्याकरिता विधानसभा व लोकसभा मध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष आग्रह धरणार असे बोलले. या कार्यक्रमाला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, ज्येष्ठ नेते प्रशांत पाटील, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, तालुका अध्यक्ष सागरबाबा मिसाळ, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर, दीपक जाधव, श्रीमंत ढोले, अभिजीत तांबिले, अमोल भिसे, विजय घोगरे, छायाताई पडळकर, दत्तात्रेय घोगरे, आतुल झगडे, सचिन सपकाळ, नरहारी काळे, श्रीकांत बोडके, चंद्रकांत सरवदे, श्रीकांत दंडवते, पांडुरंग डीसले, दादासाहेब शिरसागर, सुनील जगताप, संतोष सुतार, आरुण क्षीरसागर, दशरथ राऊत, पांडूदादा बोडके, व शासकीय पदाधिकारी यांच्यासहित तालुक्यातील सर्वच आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ, व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी खासदार सुप्रियाताई सुळे बोलत आसताना म्हणाल्या की
पन्नास कोटी रुपयाची विकास कामे ही सर्व सामान्य मायबाप जनतेच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी खर्च होतात हा राजकारणातील बदल आहे.
इंदापूर तालुक्याचा विकास हा बारामती बरोबरच होणार. पवार साहेबांचे 55 वर्षाचं राजकारण आणि समाज कारणामध्ये जेवढे चढ तेवढेच उतार आहेत 55 वर्षात 27 वर्ष सत्तेत तर 27 वर्षे विरोधात आहेत महाराष्ट्रातील प्रचंड जनतेने विश्वास व प्रेम दिले.इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीचा प्रश्न शंभर टक्के मार्गी लावून संपूर्ण ऊस गाळापासाठी अडचण येऊ देणार नाही. घरकुल मंजूर असून सुद्धा जागा उपलब्ध नसल्यामुळे गायरान जागेवर घर बांधण्यासाठी हा विषय दिल्लीच्या पार्लमेंट पर्यंत घरकुलाच्या जागेचा प्रश्न मांडुन शंभर टक्के प्रश्न मार्गी लाविन.
जल जीवन मशीन साठी केंद्र सरकार ची रक्कम 50 टक्के व महाराष्ट्र सरकारची रक्कम 50 टक्के असते परंतु केंद्र सरकारने पन्नास टक्के रक्कम दिल्याबद्दल खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सरकारचे आभार व्यक्त केले.
दत्तामामा भरणे यांनीआमदार म्हणून अनुभव घेतला गेली काही दिवस मंत्री तर आत्ता आमदारच अशी त्यांची इंदापूर तालुक्याची ओळख आसुन इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त विकास निधी आणण्याचा नेहमीच दत्तात्रय भरणे यांचा प्रयत्न आसतो . इथून पुढे देखील दहा वर्ष आमदार म्हणून दत्तात्रय भरणेच राहतील याबद्दल काही चिंता नाही खासदार सुप्रियाताई सुळे यांचे यावेळी उद्गार ,
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत आसताना म्हणाले की पीडब्ल्यूडी चा रस्ता जर कंत्राटदाराकडून चुकीचा झाला तर ताबडतोब ठेकेदारावर कायदेशीर कारवाई केली जाईल. परंतु 19 वर्षात इंदापूर तालुका व बावडा परिसराचा विकास केला नाही.
मी मंत्री नसलो तरी इंदापूर तालुक्याची कामे कोणतीच राहणार नाहीत. सर्व कामे मार्गे लावू जलजीवन मशीनच्या माध्यमातून नळाच्या पाण्याची स्कीम मंजूर केलेली आहे. व इंदापूर तालुक्याचा या माध्यमातून आराखडा तयार करून 454 कोटी रुपयांची योजना तालुक्यासाठी मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत तालुक्यातील 146 वाड्या वस्तीसाठी मंजूर केलेली ही योजना आहे. पवार साहेबांमुळे मला मंत्रीपद मिळाले ताईच्या माध्यमातून व अजित दादांच्या माध्यमातून दवाखान्याची रुग्णांसाठी सेवा करण्याचा प्रयत्न माझा नेहमीच सातत्याने आसतो.
ऊस तोडणीच्या प्रश्नाबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारे ऊस तोडणीची अडचण येऊ देणार नाही. सहकाराचे नेते म्हणता परंतु फक्त नावाला सहकार आहे. उसाचा भाव तालुक्यातील शेतकऱ्याला आज तागायत दिलेला नाही. आपल्या छत्रपती, माळेगाव, सोमेश्वर,या सारख्या साखर कारखान्याला कोणत्याच प्रकारे सभासद होण्यासाठी डायरेक्टरची शिफारस न लागता सभासद केलं जातं. परंतु इंदापूर साखर कारखाना व नीराभीमा सारख्या साखर कारखान्यात शेतकऱ्याला सभासद करून का घेतलं जात नाही अशी टीका राज्यमंत्री भरणे यांनी केली. 19 वर्षे आपण सरकारमध्ये होता तरी पण तालुक्याचा विकास करता आला नाही. लुमेवाडी भांडगाव गिरवी गोंदी या भागाचा रस्ता का झाला नाही. एवढी कामे मंजूर केली ती येड्या गबाळ्याचे काम नाही. निस्ता फोटो शो आम्ही करीत नाही. ज्या लोकांनी मला खुर्चीवर बसवीला आहे त्या माणसाची कामे नेहमीच करण्याचा माझा प्रयत्न असतो. तालुक्यातील मागासवर्गीय समाजाला शासनाचा 20% निधी मंजूर आसतो. त्या निधीच्या माध्यमातून समाजाला विकासासाठी जास्तीच जास्त निधी आणण्याचा माझा प्रयत्न राहील .
पुणे सोलापूर जिल्ह्याची हद्द जोडणारा निरनिमगाव येथील निरा नदीवरील पूल बांधणे 13 कोटी 50 लाख रुपये,, गोंदी ओझरे -गिरवी -ठोकळे वस्ती रस्ता 12 कोटी35 लाख,, कचरवाडी बावडा रस्ता 1 कोटी 30 लाख,, पिठेवाडी बावडा रस्ता 1 कोटी 50 लाख रुपये, तसेच गिरवी, पिठेवाडी, निमगाव, कचरवाडी, रुई, डाळज नंबर एक, येथील 5 कोटी50 लाख रुपये, या सर्वच कामाचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ करण्यात आला नीर निमगाव येथील कार्यक्रमा प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकर, प्रशांत पाटील, श्रीमंत ढोले, दत्तात्रेय घोगरे, यांचे प्रस्ताविक भाषणे झाली . कार्यक्रमाचे प्रस्तावना व आयोजन कैलासवासी आनंतराव पवार ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय घोगरे यांनी केले होते.
चौकट
-गायरान जमिनीवर वास्तव्य करीत आसलेल्या नागरिकांना घरकुल मंजूर आसून सुद्धा बांधता येत नाही. घरकुल बांधण्यास मंजुरी द्यावी या मुद्द्याचे पत्र खासदार सुप्रियाताई सुळे यांना बाळासाहेब सुतार यांनी याबद्दल निवेदन दिले.
चौकट
शासनाकडून मिळालेले घरकुल गायरान जागेवर बांधण्यासाठी पार्लमेंट मध्ये हा विषय मांडून घरकुलचा प्रश्न शंभर टक्के मार्गी लावू खासदार सुप्रियाताई सुळे यांचे बाळासाहेब सुतार यांनी दिलेल्या पत्राला उत्तर.
फोटो:- ओळी-निर निमगाव तालुका इंदापूर येथील कार्यक्रमात मार्गदर्शन करीत आसताना खासदार सुप्रियाताई सुळे
फोटो:- ओळी-नीर निमगाव तालुका इंदापूर येथील कार्यक्रमात मार्गदर्शन करीत आसताना माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
फोटो:- ओळी-निर निमगाव तालुका इंदापूर येथील नीरा नदीवरील नवीन बांधण्यात येणाऱ्या पुलाचे उद्घाटन करीत आसताना खासदार सुप्रियाताई सुळे