ऋषी सहारे

संपादक

 

 

आरमोरी

– येथील शहिद भगतसिंग स्मारक समिती च्या वतीने गडचिरोली नागपूर या मुख्य मार्गावरील शहरातील प्रमुख रस्त्यावर असलेल्या शहिद भगतसिंग चौकात त्यांच्या ११५ व्या जयंती निमित्ताने शहिद भगतसिंग जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

          यावेळी क्रांतिकारक शहिद भगतसिंग यांच्या फोटोला माल्यार्पण करुण भगतसिंग अमर रहे, इंकलाब जिंदाबाद, अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी डॉ.महेश कोपूलवार समितीचे कार्यध्यक्ष यांनी भगतसिंगाचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक ,व परीवर्तनवादी ,क्रांतिकारक ,विचार आजच्या तरुण पिढीला समजने अत्यंत आवश्यक आहे.असे विचार त्यांनी मांडले।

  शहिद भगतसिंग स्मारक समितीचे अध्यक्ष प्रफ्फुलभाऊ ठवकर, कार्यध्यक्ष डॉ. महेश कोपूलवार, उपाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, सचिन चुन्नीलाल मोटघरे, सहसचिव संतोषसिंग जुनी, अमिनभाई लालाणी,मिणाक्षी सेलोकर, रामहरी वाडगुरे,शबिरशेख,किशोर सोमनकार, बाबाभाई,डॉ. प्रदिप खोब्रागडे, अँड.जगदीश मेश्नाम, संजय वाकडे, घनश्याम कोडाप, प्रकाश खोब्रागडे, प्रदिप सोमनकार, इ.पदाधिकारी ,कार्यकारिणी सभासद, तसेच चौकातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.प्रास्ताविक व आभार प्रदर्शन चुन्नीलाल मोटघरे यांनी केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News