सावली (सुधाकर दुधे)
मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृह सुरु करणे, ५० विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती देणे व पोलीस भरती शिंदे-फडणविस सरकारच्या निर्णयाचे भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपुर कडून स्वागत करण्यात आले.
इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे इतर मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहे सुरु करणार तथा इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आता ५० विद्यार्थ्यांना मिळणार व पोलीस शिपाई संवर्गातील २०२१ मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट देवून एकूण २० हजार पदे गृह विभागातर्फे भरणार, आदी निर्णय राज्य सरकारने आज (दि.२७) ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले.
भाजपा ओबीसी मोर्चा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.हंसराज भैय्या अहिर,मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार वने, सांस्कृतिक विभाग, मत्स्य व्यवसाय मंत्री,आ बंटी भाऊ भांगडीया, माजी आमदार अतूल देशकर,भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भाऊ भोंगळे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर अविनाश पाल
यांच्या नेतृत्वात मागील अनेक वर्षापासून ओबीसी विद्यार्थ्यांकरीता वसतीगृहे, परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व पोलीस भरती याकरीता विविध आंदोलने केलीत व राज्य सरकारकडे मागणीचा रेटा लावून धरला होता. अनेकदा निव्वळ मागील आघाडी सरकारने आश्वासनाव्यतिरीक्त ओबीसींना काहीही प्राप्त झाले नाही. मात्र आता शिंदे-फडणविस सरकारने याबाबत निर्णय घेतल्याने ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये आनंद झाला आहे या बद्दल भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपुर चे
जिल्हाध्यक्ष चंद्रपूर अविनाश पाल, भाजपा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, भाजपा प्रदेश सदस्य प्रकाश जी बगमारे, चंद्रपूर महानगर अध्यक्ष विनोद शेरकी, महामंत्री अंकुश आगलावे,रोशन काकडे, गणेश तर्वेकर, शशिकांत मस्के, महिला अध्यक्ष रत्नमालाताई भोयर,
इत्यादींनी या निर्णयाबद्दल राज्य सरकारचे आभार मानले आहे.