उपसंपादक/अशोक खंडारे

अखिल भारतीय महिला कांग्रेसच्या अध्यक्षा डीसुजा, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या सूचनेनुसार २८ सप्टेंबरला महिलांसाठी कायदेविषयक व आरोग्य विषयक माहिती देण्यासाठी हेल्पलाइनचे उद्घाटन काँग्रेसच्या आष्टी- ईल्लुर जिल्हा परिषद क्षेत्राच्या माजी जिल्हा परिषद सदस्य रुपाली ताई पंदिलवार यांच्या हस्ते ईल्लुर येथे करण्यात आले.

 

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेत्ता डीसूजा यांनी संपूर्ण भारतात महिलांच्या मदतीसाठी १८००२०३०५८९ हा टोल फ्री नंबर जारी

केला आहे. संपूर्ण देशामध्ये महिला कांग्रेसकडून हा टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने महिलांना कायदेविषयक तसेच आरोग्यविषयक सल्ला मोफत मिळण्यासाठी या टोल फ्री क्रमांकाचा उपयोग होणार आहे. अनेकदा महिलांना कायदेशीर मदत योग्य पद्धतीने मिळतं नाही. आरोग्य विषयक माहितीपण योग्य वेळी मिळत नाही. अशा महिलांना आता या क्रमांकावरुन त्यांना भेडसवणाऱ्या समस्या दूर करता येईल. हा केवळ एक नंबर नसून स्त्री सशक्तीकरणासाठी महिला काँग्रेसने उचलले पाऊल आहे. त्यामुळे या टोल फ्री क्रमांकाचा उपयोग अधिकाधिक महिलांनी करावा, असे आवाहन गडचिरोली जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा तथा आष्टी- ईल्लुर क्षेत्राच्या माजी जिल्हा परिषद सदस्य रुपालीताई पंदिलवार यांनी यावेळी केले. सदर कार्यक्रम ईल्लुर येथे घेण्यात आला यावेळी आष्टी परीसरातील व ईल्लुर येथील कांग्रेस पार्टीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com