उपसंपादक/ अशोक खंडारे

 

 आजही चांद्यापासून तर बांध्यापर्यंत समाजातील शेवटच्या टोकापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचलेल्या नाहीत त्यामुळे एकीकडे श्रीमंत भारत तर दुसरीकडे वंचित भारत असे विदारक चित्र दिसून येते आणि म्हणून जो वंचित समाज आहे त्याला श्रीमंत समाजाविषयी आक्रोश आहे आणि म्हणून श्रीमंत – गरीब ही दरी दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी समाजाशी संपर्क वाढवून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना शासकीय योजनेच्या लाभ मिळवून देऊन समाजातील दरी दूर करावी आणि म्हणून समाजाकडे चला असे आवाहन प्रा. डॉ.भारत पांडे यांनी विद्यार्थ्यांना केले

 महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाद्वारे समाजाकडे चला हा अभियान राबविण्यात येत असून या अभियाना अंतर्गत केवळ विद्यार्थी हा चार भिंतीतील अभ्यासू नसावा तर तो समाजात जाऊन समाजाला संपर्क करून समाजातील सुखदुःखात सहभागी होऊन तेथील परिस्थितीशी जुळवून घ्यावा त्याला ती सवय जडावी यासाठी समाजातील वंचित घटकापर्यंत पोहोचण्याचे कार्य समाजशास्त्र विभागाद्वारे करण्यात येत आहे याद्वारे त्यांच्याशी हितगुज करून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी समजून त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे दुःख आपले दुःख आहे हे समजून त्यांना भावनिक आधार देण्याचे कार्य समाजशास्त्र विभागाद्वारे त्यांच्या विद्यार्थ्यांद्वारे या आष्टी परिसरात होत आहे

 त्यामुळे हा अभिनव प्रयोग पाहून आजपर्यंत आमच्याकडे कोणी आले नाही आम्ही दुर्लक्षित होतो आम्ही वंचित होतो कमीत कमीत ही नवीन पिढी आमच्याशी संपर्क साधत आहे असे वंचित समाजातील जे उपशिक्षित समाज आहे त्या समाजाशी संपर्क केला तर त्यांनी आपले विचार बोलून दाखवले आणि आम्ही गरीब असू परंतु हा समाज, हा देश आमचा आहे त्यामुळे आम्ही पण या देशाचे घटक आहोत त्या समाजाचे घटक आहेत असे संपर्क केल्यानंतर अपेक्षित समाजातील लोक म्हणू लागले आणि म्हणून समाजाकडे चला हा जो अभियान आहे तो समाज जोडण्याचे समाजातील दरी दूर करण्याचे कार्य करीत आहे असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले या अभियाना अंतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम राबविण्यात येत असून त्यात डॉ. रवी शास्त्रकार, डॉ.गणेश खुणे, डॉ.राज मुसणे, प्रा. शाम कोरडे, प्रा. रवी गजभिये,प्रा. ज्योती बोभाटे, प्रा सालुरकर,प्रा.नाशिका गबने व अन्य कर्मचारी सहकार्य करत असून समाज जोडण्याचे समाजातील दूर करण्याचे कार्य करीत आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News