प्रतिनिधी: पारशिवनी-नवेगाव खैरी
राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शालेय पोषण आहार पंधरवडा अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा, (१९सप्टें.) प्रकल्प , लेखन स्पर्धा (२२सप्टें.) आणि २७ सप्टेंबरला ‘रानभाजी पाककला’ अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक गट शिक्षणाधिकारी वंदना हटवार व प्रमुख अतिथी केंद्रप्रमुख चेतना बोबडे, नंदकिशोर बावनकुळे (जि.प.शि.), कार्यक्रमाध्यक्ष मुख्याध्यापक सोनीराम धोटे, श्रीमती जांभूळकर (सेवा.निवृत.मुख्य अध्यापक.) मंचावर उपस्थित होते.
यावेळी शाळेतील मुलींनी दुर्मिळ आणि आरोग्यास गुणकारी अशा आंबाडी, कडू भाजी, चिवळी, कुंजर, कारले, तरोटा, मटाळू, बांबूचे कोंब, कोवळे कारले, काटेमाठ,अळूची वडी, ब्रम्हराक्षस, बरबटीची पाने, करवंद, भुमंग लवठ, भोपळा या रानभाज्यांचे चविष्ट पक्वान्न तयार करून पोषण आहारात रान भाज्यांचे महत्त्व कृतीतून पटवून दिले.
मान्यवरांच्या हस्ते रानभाजी पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक नंदिनी देवराव आरसे (५०१/-), द्वितीय अंजली धर्मपाल दिवटे (३०१/-), कावेरी रामू कोडवते (२०१/-), प्रकल्पलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक नंदनी ईश्वर ढोरे, वक्तृत्व स्पर्धेत प्रथम दिपाली विनोद वारकर आणि सहभागी तनुश्री सोपान राऊत, वैष्णवी विलास झोड, माही विजय डायरे, प्रीती प्रकाश राऊत, नंदनी नंदकिशोर ढोंगे, आर्या ओमशंकर भरदिया, समीक्षा भगवान ढोंगे, किरण दिनेश टेकाम, दीपिका आनंदराव धुर्वे, वैष्णवी सुखराम भारसकरे, खुशी कैलास तांडेकर, कावेरी रामू कोडवते, काजल दिलीप चौरे यांना प्रत्येकी (१००/-) प्रोत्साहनपर पारितोषिक वितरण करण्यात आले.
शाळेतील निसर्ग मित्र मंडळाचे संयोजक व शिक्षक साक्षोधन कडबे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक सर्वश्री राजीव तांदूळकर, नीलकंठ पचारे, दिलीप पवार, सतीश जुननकर, चंद्रशेखर भोयर, शैलेंद्र देशमुख, सौ. तारा दलाल, सौ.अर्चना येरखेडे, अमित मेश्राम व शिक्षकेत्तर कर्मचारी मानसिंग कोवाचे, लिलाधर तांदूळकर, मोरेश्वर दुनेदार, रशीद शेख, गोविंदा कोठेकर आणि समस्त विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.