सुधाकर दुधे
तालुका प्रतिनिधी सावली
मानव,वन्यजीव संघर्ष दिवसागनिक वाढत जात आहे.वाघांची संख्याही वाढतांना दिसत आहे.अशा परिस्थिती मध्ये सामान्य मानसाचे जीवन जगणे कठीण झाले आहे.
याची झळ प्रामुख्याने शेतकरी व शेतमजूर लोकांना बसत आहे.सावली तालुक्यात प्रामुख्याने याच महिन्यात रान डुकरांच्या हल्यात अनेक लोक मुत्यू व जखमी झाले आहेत.
शाळकरी विद्यार्थी जखमी झालेत.सावली येथिल एक नागरीक रान डुकरांचा हल्यात जखमी झाला.वाहन चालवित असतांना अनेक व्यक्ती रान डुकरे आडवी आल्यामुळे रस्त्यावर पडली.नुकतेच डोनाळा व शिर्शी येथील नागरिकांचा वाघाच्या हल्यात मुत्यू झाला.रान डुकराच्या व वाघाच्या हल्यात मुत्युमुखी होणाऱ्यांची संख्या वाढत जात आहे.
****
वन्यजीवांचा बंदोबस्त करण्याची मागणी…
सावली तालुक्यात आज घडीला 16 वाघ दिसून येत आहेत.या वाघांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे.सदर वाघाचा बंदोबस्त करीत त्यांना इतरत्र हलविणे आवश्यक आहे.
*****
रानडुकरांना मारण्याची परवानगी हवी…
रानडुकरांच्या हौदसामुळे सामान्य शेतकरी चिंताग्रस्त आहे.शेतीचे रानडुकरे अतोनात नुकसान करतात.शेतीचे पिक पूर्णता नष्ट करतात.हाती आलेले शेतकऱ्यांचे पिक उध्वस्त होतोना शेतक-यांना डोळ्यातील अश्रू तरंगताना दिसतात.जागीच रानडूकरांना मारण्याची परवानगी शासनाकडून उपलब्ध करण्याची सोय करण्यात यावी.
*****
शेतकरी व आपदग्रस्ताना अजूनही मदत नाही…
शासनाने वाघाच्या हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना अनुदान देण्याचे जाहीर केले.मात्र,अजूनही शासनाचे अनुदान लाभार्थ्यांना मिळालेले नाही.
शेतकऱ्यांचे गुरे वाघाने फस्त केले.काही लोकांना रानटी डुकराने जखमी केले.रानडुकरांनी शेतकऱ्यांचा शेतीचे नुकसान केले.
मात्र,शासनाकडून आपादप्रस्तांना मदतीचे पैसे अजूनही दिलेले नाही.त्यामुळे सामान्य नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे.
****
नामदार विजयभाऊ वडेट्टीवार घेणार आढावा….
सावली तालूक्यात वाढते हिंसक पशूंचे हल्ले लक्षात घेता राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार विजयभाऊ वडेट्टीवार हे येत्या ०४/०९/२०२४ ला वनपरीक्षेत्र कार्यालय सावली येथे आढावा सभा घेणार आहेत.
ज्या नागरिकांना अनुदान मिळाले नाही,व ज्या शेतकऱ्यांना शेतपिकाचे नुसकान झाले आहे,त्या सर्वांनी प्रत्यक्ष हजर राहून आपली मागणी मांडावी व हिसंक पशुंची बंदोबस्त कसे करता येईल,या गंभीर समस्येबाबत या सभेत चर्चा करण्यात येणार असून,या सभेला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून सहकार्य करण्याचे विनंती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे यांनी केले आहे.