दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
मूल : – गत अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या मूल पूर्णवेळ न.प.मुख्याधिकारी म्हणून संदीप दोडे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. या निमित्ताने म.रा.मराठी पत्रकार संघातर्फे त्यांचे स्वागत करुन नगरविकासाचे सकारात्मक कामाकरीता शुभेच्छा दिल्यात.
यावेळी राज्य पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे, तालुकाध्यक्ष सतिष राजूरवार, पदाधिकारी धमैद़ सुत्रपवार,राजू सुत्रपवार, राजेंद्र वाढई, विवेक दुर्योधन आदी उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेले संदीप दोडे हे आधी चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा व चंद्रपूर येथे नायब तहसीलदार या पदावर कार्यरत होते.नाशिक येथे प्रशिक्षण घेऊन ते मूल येथे पूर्णवेळ मुख्याधिकारी म्हणून नुकतेच रूजू झाले आहेत.
यावेळी मूल नगरातील समस्यांची माहिती व इतर बाबींवर थोडक्यात संवाद साधल्यास गेला. मूल नगरवासियांनी शहरातील समस्या माझे पावेतो पोहचवाव्यात असे आवाहन यावेळी मुख्याधिकारी यांनी करून जनसमस्या सोडविण्यासाठीच आपण असून यासाठी आपण सर्वतोपरी पुढाकार घेण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.