दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
स्वाभिमानी असाल तर नितीमत्ता ढासळत नाही.ज्याची नितीमत्ता ढासळली जाते तो राजकारणातील गुलाम असतो.असे गुलाम व्यक्ती सामाजिक नेते होवुच शकत नाही,असे रोखठोक विचार सामाजिक व राजकीय विश्लेषक क्रांतिवीर मानकर (अमरावती)यांनी,”दखल न्यूज भारत,सोबत बोलतांना व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की,स्वाभिमान विकणारे स्वार्थसाधू व समाज घातकी समाजानी आजही ओळखले नाही,म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी लयास गेली आहेत.
एका निळ्या झेंड्याच्या,चिंध्या चिंध्या करून समाजाचे विभाजन करून गटबाजीचे गटार केले,”विद्वान ही, गटबाजीच्या गटारात खितपत पडून निकम्मे झाले ही सामाजिक शोकांतिका आहे असल्याच्या भावना त्यांनी बोलून दाखवल्यात.
परीवर्तन करण्यासाठी धेय्य प्रबळ पाहिजे,उद्दीष्ट सम्यक आणि प्रगल्भ पाहीजेत,त्यासाठी मानसाजवळ स्वाभिमान अतुट पाहिजे,तेव्हा तोच व्यक्ती समाजीक लढाई जिंकून पुढारी होतो,यात शंकाच नाही असे परिणामकारक मत बोलून गेले.
उपासपोटी समाजसेवा करणारे अर्धपोटी मेलेले असता,जिवंत राहावे म्हणून ते कुणाचेही गुलाम होवुन,”असे समाज घातकी,समाजाचीही पिळून करतात.म्हणून मानवी समाज रसातळाला जाऊ लागला आहे,याबाबत ते गंभीर दिसले.
मानवीयमुल्य जातीव्यवस्थातंर्गत अंधश्रद्धांच्या महासागरात गर्भित झाले.म्हणून क्रांतिवीर मानकर मृतांना ही स्मशानातून जाग करण्यासाठी लढतोय,”शोषीत पिडीतांना गटबाजीच्या गटारातून काढण्यासाठी,२० मार्च २०११ रोजी महाडच्या चवदार तळ्यावर क्रांती स्तंभाला अभिवादन करून गरजला क्रांतिवीर मानकर!अशेही क्रांतीकारक मत त्यांनी व्यक्त केले.
“नेत्यांना हाकला-समाजाला वाचवा-गटबाजी संपवा,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुन्हा एकदा उभारण्याच्या अनुषंगाने विचार व्यक्त केले.तद्वतच क्रांतिवीर मानकरणे समाजाला वाचवण्यासाठी व नेत्यांना हटवण्यासाठी,डॉ.बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे परिवर्तनात्मक चळवळ घालून,घडवून आणली, ती म्हणजे,भारतीय जनता..”राजा गर्जना त्याचा झेंडा आहे निळा!.. पांढरा,हिरवा,पांढरा,वरती 22 प्रतिज्ञाचे भीम चक्र असा भीम चक्राचा तिरंगा आता आगेकूच करायचा असेल तर स्वाभिमान घेऊन पुढे या असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
उद्देश स्पष्ट ठेवून पुढे या,”गतिमान करूया भीमचक्र,अंधश्रद्धेच्या गटारातून समाजाला नव्हे तर भारतीय मानवाला वाचवण्यासाठी,”तथागत बुद्धांचा धम्म देशाला देण्यासाठी आगे कूच करायचे आहे.क्रांतिवीर मानकर आपल्या सोबत आहे..