उमेश कांबळे
भद्रावती तालुका प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वरोरा-भद्रावती विधानसभा वतीने तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित केलेल्या भव्य दहीहंडी महोत्सवाने भद्रावतीत प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. जिल्हाप्रमुख तथा विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्त्वात आयोजित या महोत्सवाने भद्रावतीवासियांचे लक्ष वेधून घेतले आहे, ज्यामुळे जिवतोडे यांचे नेतृत्व कौतुकास्पद ठरले आहे. या यशामुळे ते आगामी आमदारकीसाठी एक प्रभावी दावेदार म्हणून उदयास आले आहेत.
या महोत्सवाचे आयोजन संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला असून, हजारो भद्रावतीवासियांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जय महाकाली क्रीडा मंडळ, चंद्रपूर यांनी ३३ फूट उंचीची दहीहंडी फोडून ३३ हजार रुपयांचे पारितोषिक जिंकले, तर महिला गटात गोपिका गर्ल्स, बल्लारशाह व हिरकणी ग्रुप भद्रावती यांनी १५ फूट दहीहंडी फोडून १५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले. या रोमांचक स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
दहीहंडी महोत्सवात विविध सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये रांगोळी, श्रीकृष्ण वेशभूषा, राधा वेशभूषा, आणि मा यशोदा स्पर्धांचा समावेश होता. रांगोळी स्पर्धेत अर्चना बुरवादे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक संगीता टोंगे व तृतीय क्रमांक प्रतिभा भोयर यांनी पटकावला.श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेत २ ते ६ वर्षे वयोगटात स्वरीत भिवगडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय क्रमांक विहान मामीडवार व तृतीय क्रमांक मीत बेलखुंडे यांनी पटकावला. तर ७ ते ११ वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक विराग कोठे, द्वितीय क्रमांक नित्विक डंबारे व तृतीय क्रमांक समर्थ बिडवाईक यांनी पटकावला. तर राधा वेशभूषेत २ ते ६ वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक नवीका डंबारे द्वितीय क्रमांक इशिया जंगम व तृतीय क्रमांक श्रेया गिरी यांनी पटकावला. तर ७ ते ११ वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक शिफा पवार द्वितीय क्रमांक रीशिका गुलानी व तृतीय क्रमांक मैथली पारेकर यांनी पटकावला. तसेच मा यशोदा वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक ज्योती मुसावत, द्वितीय क्रमांक आश्लेषा चांदेकर तर तृतीय क्रमांक सपना देवगडे यांनी पटकावला.या सर्व कार्यक्रमांच्या आयोजनातून मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाच्या दृष्टीकोनात व्यापकता आणि संवेदनशीलता दिसून येते.
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणून सिने अभिनेते भारत गणेशपुरे आणि प्रसिद्ध अँकर परेश आणि लावणी कलाकार सोनाली पाटील यांनी उपस्थित राहून कार्यक्रमात रंगत आणली. त्यांच्या उपस्थितीने उपस्थितांची मने जिंकली आणि कार्यक्रमाला एक नवी उंची प्राप्त झाली. या कार्यक्रमाला माजी उपाध्यक्ष नगर परिषद भद्रावती प्रफुल चटकी, जिल्हा उपाध्यक्ष अमित निब्रड,माजी नगरसेवक विनोद वानखेडे, सुधीर सातपुते, चंद्रकांत खारकर, राजु सारनधर, निलेश पाटील, रेखा खुटेमाटे, शोभा पारखी, लक्ष्मी पारखी, रेखा राजूरकर, शितल गेडाम, प्रतिभा सोनटक्के, अनिता मुडे, सूनिता टिकले, आशा निंबाळकर, किर्ती पांडे, वसंता मानकर, विपीन काकडे, दिनेश यादव ,बंडुभाऊ चटपल्लीवार, महेश जिवतोडे, नितीन कवासे,संदीप मेश्राम , सुधाकर मिलमिले, बंडू डाखरे,निलेश वासनिक, देवेंद्र गडपाले, मंगेश ढेंगळे, मुकेश मिश्रा, सूनील आवारी, अरविंद खोबरे, स्वनील उपरे, सुरज डाखरे, जितु गुलानी, किशोर टिपले, गणेश चीडे, निखिल मांडवकर, ओंकार लोडे,अक्षय झिले,महेश देवतळे, हनुमान ठेंगणे, शुषमा भोयर, प्रणाली मेश्राम,तेजश्री हनुमंते, यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील विविध सामाजिक संघटना आणि पत्रकारांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यामध्ये गुरुदेव सेवा मंडळ, पतंजली योग समिती, जेष्ठ नागरिक संघ, ग्राहक मंच, व्यापारी संघटना, जय हिंद फाउंडेशन, झाडी बोली संघटना, लोकमत सखी मंच, इको प्रो संघटना, महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ, भद्रावती पत्रकार संघ, व्हाईस ऑफ मीडिया, इंनरव्हिल क्लब, रोटरी क्लब आदी संस्थांचा समावेश होता. या सन्मानाने जिवतोडे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या संघटन कौशल्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्त्वात झालेल्या या यशस्वी दहीहंडी महोत्सवामुळे त्यांच्या लोकप्रियतेला एक नवा आयाम मिळाला आहे. त्यांच्या नेतृत्त्वाने भद्रावतीतील शिवसेनेचे स्थान अधिक मजबूत झाले असून, आगामी विधानसभा निवडणुकीत ते आमदारकीसाठी एक प्रभावी दावेदार म्हणून उदयास येत आहेत. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि नेतृत्वगुणांमुळे या महोत्सवाचे यश सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
या भव्य आणि यशस्वी महोत्सवामुळे भद्रावतीतील जनतेने जिवतोडे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास दर्शविला आहे. महोत्सवाच्या यशस्वीतेमुळे मुकेश जिवतोडे यांनी समस्त भद्रावतीकरांचे आभार मानले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आयोजन, एकीकडे समाजातील विविध घटकांना एकत्र आणून त्यांचे सत्कार करण्यात यशस्वी ठरले, तर दुसरीकडे त्यांनी आपल्या नेतृत्त्वगुणांचे आणि जनतेसाठी असलेल्या तळमळीचे प्रत्यय दिले आहे.
शिवसेनेचे प्रचारक टी-शर्ट्सचे वितरण
कार्यक्रमाच्या दरम्यान, मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या फोटोसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे १००० टी-शर्ट्सचे वितरण करण्यात आले. या टी-शर्ट्सच्या वितरणामुळे महोत्सवात शिवसेनेच्या प्रचाराची वेगळीच छाप पडली आहे.
वरोरा – भद्रावती विधानसभेच्या भविष्यासाठी नवी आशा
या महोत्सवाच्या यशस्वीतेने मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात भद्रावतीचा विकास आणि समृद्धी साधण्यासाठी एक नवा अध्याय सुरू झाला आहे. आगामी काळात त्यांचे नेतृत्व भद्रावतीत परिवर्तन घडवून आणण्यास सक्षम असेल, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील हा महोत्सव, त्यांची जनाधार व लोकप्रियता, आणि त्यांची आमदारकीसाठीची दावेदारी यामुळे भद्रावतीतील राजकीय आणि सामाजिक समीकरणे बदलणार आहेत.