दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : येथील वारकरी संगीत परंपरा व प्रसारासाठी आपले जीवन समर्पित करणारे श्री ज्ञानाई संगीत विद्यालयाचे सर्वेसर्वा भजनसम्राट हभप आदिनाथ महाराज सटले गुरुजी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते वारकरी संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल “संगीतरत्न” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी मानपत्र, स्मृतीचिन्ह, भगवान श्रीविठ्ठलाची मुर्ती, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.
राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे तिसरे वारकरी संमेलन पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी संमेलनाध्यक्ष हभप बापूसाहेब मोरे, स्वागताध्यक्ष जयंत पाटिल, निमंत्रक विठ्ठल मोरे, संपादक संजय आवटे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, माजी महापौर प्रशांत जगताप, मुबारक शेख, दत्ता महाराज साबळे तसेच वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.