पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉइस ऑफ मीडिया गडचिरोलीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन…

ऋषी सहारे

संपादक

     गडचिरोली : पत्रकारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर २८ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्हॉइस ऑफ मीडिया गडचिरोलीच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

          दहा वर्षांपासून पत्रकारिता करणाऱ्यांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे, राज्याच्या माहिती महासंचालनालयाने पोर्टल तयार करून पदवी पूर्ण केलेल्या व पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, अशांना पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे, पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे, सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन २० हजार रुपये मानधनाचा शासनादेश काढावा, पूर्णवेळी जिल्हा माहिती अधिकारी नेमावा आदी मागण्या करण्यात आल्या. 

         यावेळी जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार, सुमित पाकलवार, कार्याध्यक्ष, विदर्भ विभाग, मुकुंद जोशी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, रेखाताई वंजारी जिल्हाध्यक्ष, साप्ताहिक विंग, नासिर हाशमी कार्याध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी, संजय तिपाले, कार्याध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी यांच्या मार्गदर्शनात प्रकाश दुबे, कार्याध्यक्ष, साप्ताहिक विंग, कृष्णा वाघाडे जिल्हा कार्यवाहक, ज्येष्ठ पत्रकार कांतिभाई सूचक, प्रकाश ताकसांडे, संगीता विजयकर, जगदीश कंनाके, नरेश बावणे, मुरलीधर बोरकर, अनुप मेश्राम, संदीप कांबळी, मुकेश गेडाम, नरेंद्र माहेश्वरी, नितीन ठाकरे, पुंडलीक भांडेकर, मिलिंद खोंड, ताहीर शेख, चेतन गहाणे, सुनील नंदनवार,ऋषी सहारे, विलास ढोरे, शैलेश पोटवार, शरीफ कुरेशी, राहुल अंबादे, अविनाश गुरनुले, विस्तार गंगाधरीवर, लीलाधर कसारे, रमेश मारगोनवर, गोविंद चक्रवर्ती, मनीष येमूलवार, महेंद्र कोठारे, ईश्वर पर्सेलवार, अविनाश नारनवरे, राजरतन मेश्राम आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी संजय मीणा यांना निवेदन देण्यात आले.