युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
मांजरी म्हसला केंद्राची सन २३/२४ या सत्रातील ऑगस्ट महिन्याची शिक्षण परिषद नुकतीच जिल्हा परिषद पूर्व माध्यामिक शाळा एरंडगावं येथे संपन्न झाली.
या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी आ. कल्पनाताई ठाकरे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र मोटघरे उपाध्यक्ष शा.व्य. समिती, प्रमोद मारोटकर सदस्य शा.व्य.समिती, सत्कार मूर्ती प्रशांत गुल्हाणे उच्चश्रेणी मुख्य., कमलाकर कदम, सुरज मंडे व्यासपिठावर विराजमान होते. या शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन प्रशांत सापाने यांनी तर प्रास्तविक रवींद्र गजभिये यांनी केले आणि आभार प्रदर्शन गजानन वाके यांनी केले. श्री.अंकुश गावंडे यांनी useful marker less app_3Dbear आणि useful marker based app_Quier व इतर शैक्षणिक ॲपबद्दल प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले. कू.अर्चना जुंबळे यांनी इयत्ता १ ली ते ५ वी च्या इंग्रजी विषयाचे लर्निग आऊटकम याबाबत अवगत केले आणि इंग्लिश चे विविध भाषिक खेळ घेतले.
शिक्षण परिषदेमध्ये सर्वप्रथम उच्चश्रेणी मुख्याध्यापक प्रशांत गुल्हाणे यांचा स्वेच्छानिवृत्ती बद्दल केंद्रातर्फे शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला ,तसेच एरंडगाव शाळेतर्फे बोधीवृक्ष व एक पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांचे स्वागत गुलाबपुष्प देवून करण्यात आले. याप्रसंगी सुरज मंडे यांनी आपल्या मनोगतामध्ये शिक्षकांचे स्वेच्छानिवृत्ती घेण्याचे वाढते प्रमाण ही एक चिंतनीय बाब असल्याचे व प्रशांत गुल्हाणे यांनी आपल्या सेवेत अनेक क्रीडा महोत्सवात प.स.आणि जिल्हा परिषद प्रशासनास मोलाचे सहकार्य केल्याबद्दलचे मनोगत व्यक्त केले. आपल्या सेवेतील शाळेबद्दलच्या व सहकाऱ्यांच्या जुन्या गोड आठवणीनां प्रशांत गुल्हाणे यांनी उजाळा दिला व त्यांचा निरोप समारंभ आयोजन बद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले. मध्यंतरी स्नेहभोजनचा आनंद घेण्यात आल्यानंतर आदरणीय केंद्रप्रमुख कल्पनाताई ठाकरे यांनी शिक्षण परिषदेच्या दुसऱ्या सत्रामधे प्रामुख्याने अध्ययन, अध्यापन, विविध शासकीय योजना व सर्वेक्षण आणि इतर शासकीय बाबींचा आढावा घेऊन त्यावर मार्गदर्शन केले.
शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेकरिता केंद्रातील सर्वश्री रवी गजभिये, प्रशांत सापाने, गजानन होळकर, गजानन वाकें, हर्षमाला मासोतकर, सुरज मंडे, संजय नेवारे, अनिल देशमुख, मनोज भांदर्गे, दिपिका अर्बाळ, प्रियंका राणे, शिवहरी मुघल, हेमलता भिमटे, जितेंद्र यावले, सतीश डोंगरे, उमेश ठाकरे, राजेंद्र काळे, किशोर गणवीर, पवन मसराम, राजेंद्र देशमुख, धनाजी चव्हाण, अजय गावंडे, विजय चव्हाण, उज्ज्वला भडांगे, सुषमा गिरी, रेखा बोकडे, प्रेरणा पेठे, अनिता जोशी, ज्योती जगताप, अर्चना कवाने, स्वाती पोकळे, अर्चना बैतूले, अनघा भोपळे, प्रणिता मनगुळे, राखी सरोदे, सविता खडसे, राहुल आकोडे, यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते.