रा. तु. महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा…

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमूर :- स्थानिक गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने 25 वा कारगिल विजय दिवस संपन्न झाला.

           या कार्यक्रमाचे अध्यक्ष गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ.दीपक यावले होते. त्यांनी कारगिल शहीदाना अभिवादन करून कारगिल विजयाची शौर्यगाथा सांगितली.

           सचिव प्रा. विनायक कापसे प्रमूख पाहुणे होते. प्राचार्य डॉ. अश्विन चंदेल यांनी कारगिल शहिदाना अभिवादन केले.

            कारगिल युद्ध का झाले व भारतीय सैनिकांनी विजय कसा मिळविला या विषयी माहिती सांगितली.

            उपप्राचार्य डॉ. प्रफुल बनसोड यांनी आपल्या प्रास्ताविकेतून कारगिल विजयाचा इतिहास कथन केला. याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ. कार्तिक पाटील, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.हरेश गजभिये उपस्थित होते.

            अध्यक्षांनी आपल्या भाषणात कारगिल विजयाचा विस्तृतपट कथन केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रफुल राजुरवाडे यांनी केले आभार समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.पितांबर पिसे यांनी केले.

            समारोपाला विद्यार्थ्यांना कारगिल युध्दाच्या माहितीपट दाखविण्यात आल्या.कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनाचे विद्यार्थी उपस्थित होते.