
कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवणी
पारशिवनी:- पेंच – नवेगाव खैरी धरणातील पाणी साठा रविवार आज दिनांक२८/०७/२०२४ ला रात्रि ९:२५ वाजता १००% झालेला आहे.
मध्यप्रदेश मध्ये सुरू असलेले पावसामुळे चौराई धरणातून विसर्ग सोडण्यात आला असल्याने तोतलाडोह धरणात येवा वाढला असून तोतलाडोह धरणाचे वक्रद्वार उघडण्यात आले आहे.
तसेच तोतलाडोह जलविद्युत निर्मितीतून बाहेर पडणारा पाण्याचा विसर्गामुळे आज दि.२८/०७/२०२४ ला आता रात्री ९:१५ वा. पेंच नवेगाव धरणाच्या पाणीसाठा १००% झाल्यामुळे धरण सुस्थीतीत/ नियंत्रणाकरीता जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे धरणाचे दोन गेट रात्री ९.१५ वाजता ०.३० मी. उंचीने उघडण्यात आले आहे यामधून ६३.३६८ क्यूमेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
तरी कन्हाननदी पेंचनदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवा-गमन करणाऱ्या सर्व संबंधीतानी स्वतः ची काळजी बाळगावी त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे.
सर्व यंत्रणांनी आवश्यक ती संपुर्ण खबरदारी बाळगून सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या स्तरावरुन तसे सर्व संबंधितांना त्वरित सुचीत करण्यात आले आहे असा सतर्कतेचा ईशारा तहसिलदार तर्फे देण्यात येत आहे.
जलाशयात तोतलाडोह धरणातून येवा जास्त येत असल्याने सर्व १६ वक्राकार द्वारे ३० से.मी. नी टप्पा टप्पा ने उघड्यंत येतील, तसेच जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे.
सर्व यंत्रणांनी आवश्यक ती संपुर्ण खबरदारी बाळगून सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या स्तरावरुन तसे सर्व संबंधितांना त्वरित सुचीत करण्यात आले आहे
आताची जलाशय पातळी : ३२५.०००
उपयुक्त पाणीसाठा :१४१.९८१ दलघमी
उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी : १००.००% आहे.
अशी माहिती उप विभागीय अभियंता पेंच पाटबंधारे उपविभाग पारशिवणी आणि तहसिलदार राजेश भंडारकर यांनी दिली.
पेंच – नवेगाव खैरी धरणातील पाणी साठा आज रात्री ९.१५ वाजता १००% भरला आहे. असल्याने पेंच धरणाचे दोन वक्राकार द्वार आवश्यकतेनुसार उघडण्यात येतील व विसर्ग पेंच नदी कन्हान नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
तरी तालुकातील महसूल यंत्रणेसह सर्व संबंधित यंत्रणा, नदीकाठावरील गावातील रहिवाशांनी सतर्क राहून खबरदारी घ्यावी ही विनंती.
एन.एस.सावरकर, उप विभागीय अभियंता, पेंच पाटबंधारे उप विभाग, पारशिवनी.
पारशिवनी महसुल विभागातील सर्तक राहण्याचे ईशारा दिला आहे तहसिलदार राजेश भंडारकर यांनी सर्व तलाठी कोतवाल पोलिस पाटिल ग्राम सेवक व संबंधित कर्मचारी यांना सुचित करून नदी किनार वर नाला जवळ राहणारे, तसेच शेतकरी यांना महसुल विभागातील अधिकारी तहसिलदार राजेश भंडारकर यांनी सर्तक राहण्याचे ईशारा दिला आहे.