युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
प्रबोधन प्राथमिक शाळा दर्यापूर येथे शिक्षण सप्ताह निमित्त अखेरचा दिवस हा “समुदाय व सहभाग दिवस” म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेच्या मुख्याध्यापिका कु. करुणा इंगळे मॅडम यांनी स्थान भूषवले तर कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैन्यातील सेवानिवृत्त सुभेदार श्री अर्जुनजी डोंगर दिवे तसेच शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक प्रवीण कुमार गोलछा, तसेच इंजि. श्री अभय दादा देशमुख होते.
शाळेला नेहमी सर्वच बाजूने मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां सौ. अंबिका संतोषराव कोल्हे आणि युवा माजी विद्यार्थी अमात्य डोंगरदिवे इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते कार्यक्रमाचे बहारदार संचालन कु. स्वाती जाधव यांनी केले तर प्रारंभी सुमधुर स्वरात कु. मालीमा सुसतकर यांनी स्वागत गीत म्हटले प्रमुख पाहुणे इंजिनियर अभय दादा देशमुख यांनी शाळेविषयी आणि व्यवस्थापना विषयी भरभरून कौतुक केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका कु. करुणा ईंगळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षण सप्ताह विषय संपूर्ण माहिती देऊन समुदाय व सहभाग दिवसाचे महत्त्व पटवून सांगितले व शाळेत सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यासोबत सह भोजनाचा आनंद घेतला.
सदर कार्यक्रमाला मुख्याध्यापिका कु. करुणा इंगळे मॅडम तर ज्येष्ठ शिक्षिका मालीमा सुसतकर, स्वाती जाधव, मनीषा आगाशे, विशाल आगाशे, राम जवुळकर, शामल आगलावे, रूपाली कोरडे, रूपाली कळसकर, रिटा गहरवाल, सुनिता सवाईकर, आदींनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला तर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन श्री राम जवुळकर यांनी केले.