रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष तथा दखल न्यूज भारतचे संस्थापक संपादक प्रदीप रामटेके हे संवेदनशील व्यक्तीमत्व असून कर्तव्यदक्ष समाजमन आहेत.
त्यांचे सामाजिक,राजकीय,पत्रकारीता,व इतर क्षेत्रातील योगदान बघता,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या तर्फे पुष्पगुच्छ देऊन,”प्रदीप रामटेके यांचा सन्मान,करण्यात आला.
“पत्रकार संवाद यात्रा,निमित्ताने नागपूर दिक्षा भुमीच्या आॅडिटोरिअम हाॅलमध्ये,”लोकशाहीच्या बळकटीसाठी व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी,या महत्त्वपूर्ण भुमिकातंर्गत व विषायातंर्गत प्रथम सभेचे आयोजन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नागपूर द्वारा करण्यात आले होते.
या पत्रकार संवाद यात्रेचे सभाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे हे होते तर मुख्य मार्गदर्शक म्हणून संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे होते.
तद्वतच विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा.महेश पाणसे,नागपूर जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे आणि पत्रकार संघाचे इतर राज्यस्तरीय पदाधिकारी विशेष मार्गदर्शक म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते.
काल झालेल्या,”पत्रकार संवाद यात्रेची प्रारंभिक सभा, महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या भव्य उपस्थितीत संपन्न झाली.
राजकीय,पत्रकार व सामाजिक घटक म्हणून प्रदीप रामटेके यांचे योगदान वंचित,शोषित,अन्यायग्रस्त नागरिकांसाठी खूप मोठे आहे.
त्यांच्या पत्रकारिता अंतर्गत अनेक नागरिकांना न्याय मिळाला आणि त्यांची लेखणी अनेकांची आधार बनून पुढे आली आहे हे नाकारता येत नाही.
प्रदीप रामटेके यांची पत्रकारीता निर्भिड असून निष्पक्ष आहे.ते कुणालाही न घाबरता जनकल्याणासाठी पत्रकारिता करतात हे अनेकदा अधोरेखीत झाले आहे.
याचबरोबर एन.जागतिक मानवाधिकार संघटन भारत अंतर्गत महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य उत्तम व उत्कृष्ट असल्याने त्यांच्या यथायोग्य कार्याची दखल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली व त्यांचा,”सन्मानपूर्वक सत्कार, नागपूर येथील पत्रकार संवाद यात्रेच्या प्रारंभिक सभेमध्ये केलाय.