लेखकांच्या लेखणीतून आणि वक्त्याच्या तोंडातून, सार्वजनिक अन्यायाविरोधात हायड्रोजन बॉम्ब बाहेर पडले पाहिजेत…..! — तोच खरा पत्रकार आणि क्रांतिकारक…

       आज आमची पत्रकारिता ( प्रस्थापितांची ) दै.लोकमत,दै. सकाळ, दै.दिव्य मराठी,दै. पुढारी,दै.पुण्य नगरी,दै.महाराष्ट्र टाइम्स,इत्यादी सर्वच दैनिकांची पत्रकारिता गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारितेच्या बाबतीत षंढ…,.

  नेभळट……

  नपूंसक होऊन बसली आहेत….!

             कारण यांनी गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारितेची नांगी हळूहळू टाकलीच, शिवाय गेल्या 10 वर्षात यांनी मोदी – शहाच्या व्यवस्थेच्या साड्या आणि बांगड्या घालून आपले नपुंसकत्व सिद्ध केले..

             आणि जवळपास यांचीच आणि इतर कांही इलेक्ट्रॉनिक मीडिया सुद्धा हीच री ओढून या सर्वांनी मिळून सर्वच राजकारण्यांच्या,चित्रपट नट नट्याच्या,नितिभ्रष्ट सनदी अधिकाऱ्यांच्या,जगण्याच्या जीवनप्रणालीलाच संपूर्ण देशाची मिजास आणि दिशा दाखवून दिल्यामुळेच सर्वसामान्य जनतेला यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेचे आणि प्रवाहाचे गुलाम बनायला भाग पाडले.

               म्हणून आम्ही ( सर्वसामान्य जनता ) लोकशाही असून सुद्धा यांचे बटीक होऊन बसलो.

         आमचे साहित्यिकांचे साहित्य हे सुद्धा पत्रकारितेचे लोकशाहीत एक अंग असते.कारण साहित्य केवळ समाजाचा आरसा नसतो,तर तो समाज ज्या सांस्कृतिक,आर्थिक अवस्थेत आहे त्या अवस्थेतून सुधारित अवस्थेत घेऊन जाण्याचे कर्तव्य हे साहित्यिकांचे असते.समाजात जर वाईट घडत असेल तर ते वाईट घडू न देता,चांगले घडविण्यासाठी परिणामकारक प्रयत्न करणे हे लोकशाहीत या साहित्याचे, पत्रकारितेचे नैतिक कर्तव्य आहे…..

         त्यासाठी व्यवस्था ज्या पद्धतीने समाजाला लोकशाही पटरीवरून भरकटत घेऊन जाते,त्याच्या दुप्पट शक्तीने त्या व्यवस्थेला रुळावर आणण्याचे काम प्रसार माध्यमाचे लोकशाहीत आहे.

          आज जी काही थोडीबहुत लोकशाही व संविधानाची शक्ती टिकून आहे ती केवळ समाजातील इंटरनेटवर अवलंबून असलेल्या व्हाट्सअप,गुगल, फेसबुक यासारख्या प्रसार माध्यमामुळेच….

       पण तरी सुद्धा या प्रसार माध्यमाचा वापर करण्याची संधी आमची सुशिक्षित युवापिढी आणि लेखक मंडळी जागृतीसाठी न वापरता प्रवाहाने निर्माण केलेल्या प्रवाहातच पुन्हा वाहत जातात.

        म्हणूनच तर RSS आणि कुटनीतीचे फावून काळ सोकावत चालला आहे….!

        त्यासाठी आजच्या प्रस्थापित दै.वर्तमानपत्रांच्या व्यतिरिक्त,जी वर्तमान पत्रे पत्रकारिता जिवंत ठेवण्याचे कार्य करतात,जे लेखक आपल्या लेखणीतून,हायड्रोजन बॉम्ब टाकू शकतात,जे वक्ते आपल्या तोंडून कृतीतून क्रांती करू शकतात, अशा सर्वांनी कृतिशीलता दाखवून,पुढे यावे…..

        आता कुणी आपल्यासाठी अवतारी पुरुष जन्माला येणार नाही…

         प्रत्येकालाच अवतारी महापुरुष म्हणून सिद्ध होण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे, कोणतीही सबब न सांगता समस्यांचा डोंगर पार करून..

          जागृतीचा लेखक

            अनंत केरबाजी भवरे

            संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरकर, 7875452689…