सर्पमित्रांची तत्परता,सापाला घरातून काढीत सोडले जंगलात…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली : पावसाळ्यातील पहिल्या पाण्याने दडलेले साप रस्त्यावर येतात. अचानक घरात शिरून कुटुंब घाबरून जाते. पण यावर सर्पमित्रांना एका दुरध्वनीवर घरी पोहचून त्या सापाला पकडून सुरक्षित वन्य शिवारात सोडून दिले जाते. ही घटना आहे शनिवार २९ जूनच्या दुपारी ३:३० ची गणेश वार्ड साकोली येथील. 

          शनिवारी दु. ३:३० ला हलक्या पावसाच्या सरी आल्या. दरम्यान “साकोली मिडीया” प्रतिनिधी जूने पंचायत समितीच्या मागील रोडानी दूचाकीने जात असता येथील मुशिर खान यांच्या घरील बंद दरवाज्यापुढे एक दोन फूट लांब साप वेगाने येत आतमध्ये दरवाज्यातून आत शिरला.

          त्याच क्षणी घरात कुणालाही माहीत नाही आणि अचानक आतमध्ये लहान मुलांना जिवितहानी होऊ नये करीता मिडीया प्रतिनिधीने गणेश वार्डातीलच युवा सर्पमित्र गोविंद धुर्वे व प्रणित मंडारे यांना फोन केला.

          दोघेही अवघ्या ५ मिनिटात हजर होत मुशीर खान यांच्या घरात जाऊन गोदरेज कपाटामागे दडून बसलेल्या “पानदिवड” या दोन फूट लांब सापाला पकडून सुरक्षित वन्य क्षेत्रात सोडून दिले. यावेळी खान कुटूंबीयांनी “साकोली मिडीया” आणि या वेळी तत्परता दाखविणारे दोन्ही सर्पमित्रांचे मनस्वी आभार मानले आहे.

          पावसाळ्यात अश्या क्षणी अनेकांच्या घरात विषारी साप शिरतात यावर मात्र शहरातील सर्वच सर्पमित्र आपल्या जिविची पर्वा न करता जनतेचा जीव वाचवण्यासाठी धावून येतात हे उल्लेखनीय कामगिरी आहे.