राज्य संघटक दिलीप तांदळे यांची,एन.जागतिक मानवाधिकार संघटन पदाधिकाऱ्यांनी केली आस्थेंनी विचारपूस…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

             वृत्त संपादीका 

          एन.जागतिक मानवाधिकार संघटन भारतचे महाराष्ट्र राज्य संघटक दिलीप तांदळे यांचा अनावधानाने अपघात झालाय.दिलीप तांदळे यांची शासकीय मेडिकल मधून सुट्टी झाल्यानंतर त्यांच्या नागपूर येथील घरी सदिच्छा भेट देत अपघाता बाबत महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांनी व नागपूर शहर अध्यक्षांनी आस्थेंनी विचारपूस केली व अपघाताची आणि प्रकृती सुधारणे बाबत माहिती जाणून घेतली.

           राज्य संघटक दिलीप तांदळे यांच्या भेटी दरम्यान महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा मध्यमा मनिष सवाई,महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्षा दिक्षा कऱ्हाडे,महाराष्ट्र राज्य सदस्य मनीष सवाई,नागपूर शहर अध्यक्षा डॉ.शालीनी हेडाऊ हे पदाधिकारी प्रामुख्याने हजर होते.

          महाराष्ट्र राज्य संघटक दिलीप तांदळे यांच्या सोबत अपघात व इतर बाबतीत करण्यात आलेली चर्चा दिलासा देणारी व सार्थक ठरावी हाच उद्देश भेटी मागचा होता.