डॉ.बाबासाहेब आंबेडकर समवेत आपण १४आक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दिक्षा घेवून नवजिनाला सुरू केली.
मी त्या दिवशी तुमची वाट पाहतोय तर काय दरवर्षी मी अफाट जनसागराच्या जयभीमाच्या जल्लोषात आनंदीत होते.
माझे कस्सप वस्त्र परिधान करून आलेल्या भिक्षुकांच्या त्रिसरण पंचशील मधूर आवाजाने शांतिचा संदेश देते…
मनूवाद्यी व्यवस्थेला व त्याचे दलालांना माझे पावित्र्य संपवायचेच आहे.म्हणून मला सौंदर्यात सजवून छुप्या मार्गाने माझे अस्तित्व संपविण्याचा कट मनूवाद्यी करीत आहे.तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत याचे दुःख मला आहे.
हे दुःख तूमची पिढीला होईल तेव्हा तुम्ही जिवंत असणार नाही,मग आज मेल्यासारखे असलेल्या मुर्दाडानो व्हा जिवंत आता माझे पावित्र्य वाचवण्यासाठी!
सौंदर्याच्या हव्यासापोटी मला संपवीले तोडले पडले तर तुमची अस्मिता काय? याचा विचार का करित नाही?डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मला पावनभुमी केले.
पण अजून नाव शासन दप्तरी (७/१२) नाही हे माझे दुर्भाग्य नसून तुमची निष्क्रियता आहे,ही निष्क्रियता संपवीण्यासाठी काही बौद्ध बांधवांनी संघर्ष करीत आहे,मी त्याची वृणी आहे.
क्रांतिवीर मानकर मला खंबीर उभे ठेवण्यासाठी १९९० पासून प्रयत्न करतो आहे,तर वरोरा येथील विनोद कवडूजी खोब्रागडे यांनी मला वाचवण्यासाठी माझ्या विरोधकास न्यायालयात हजर करण्यात आलं असून आंधळ्या बौद्ध बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो आहे.
युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दिक्षा भुमीला वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
१). दिक्षा भुमी वरील सौंदर्य करनाच्या नावाखाली केले खोदकाम जसेच्या तसे बुजून टाकावे ती जमिन जशी होती तशीच करण्यात यावी.
२) १९५६ ला उपलब्ध असलेल्या पुर्णपणे जमिनीचा ७/१२ दिक्षा भुमीचे नावे शासनाने करावा व त्या जमिनीवर केलेले अतिक्रमण शासनाने त्वरित काढावे .
३) स्मारक समीतीला वरील भाग १/२ माण्य नसेल तर स्मारक समीती बरखास्त करावी तथा स्मारक समीतीच्या पदाधिकारी-सदस्य यांनी जनतेला राजीनामे द्यावेत आणि दिक्षा भुमी जनतेच्या स्वाधीन करावी..
१७/७ पर्यंत दिक्षा भुमी बचाव आंदोलन नागपूर येथे क्रांतिवीर मानकर कडून हा सामाजिक लढा लढणार सर्व बौद्ध बांधवांनी सहकार्य करावे अपेक्षा..
दिक्षा भुमी, वाचवायची,वाचवा?