भारतीय संसदीय लोकशाहीची आगेकूच हुकूमशाहीकडे व्हाया अध्यक्षीय लोकशाहीकडून…

       “देशात अठराव्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या. मोदी शहाच्या भोवतीच सर्व देश आणि लोकशाही पिंगा घालत येन केन प्रकारे सर्वच राजकीय पक्ष आणि नेते तद्वतच जनता सुद्धा EVM द्वारे हतबल होऊन या जोड गोळीच्या कूत्सित राजकारणाला बळी पडली…..!

           “मोठा गाजावाजा होऊन,संविधान धोक्यात समजून जनतेनी आणि विरोधकांनी जरी त्यांच्या विरोधात मतदान केलेलं असलं, तरीसुद्धा त्यांचं सत्तेवर बसण्यापासून कुणीही या संविधानविरोधी शक्तीला रोखू शकले नाही, हे वास्तव नाकारता येत नाही.

             2014,2019 आणि 2024 या केंद्रसरकारमध्ये कोणता बदल झाला?

प्रधानमंत्री तोच……

गृहमंत्री तोच……

अर्थमंत्री तोच…….

संरक्षणमंत्री तोच…….

परराष्ट्रमंत्री तोच……

लोकसभा अध्यक्ष तोच…….

     केवळ विरोधी पक्षनेतेपदाची नवीन भरती झाली तेही सशक्त नसलेली…….!

       अशी ही आमची अठरावी लोकसभा, असे हे आमचे तिसऱ्यांदा विराजमान झालेले केंद्रसरकार,आणि यांच्यामागे उभी असलेली विभूतीपूजेनी ग्रासलेली,मागे हात सदैव बांधून असलेली सर्वसामान्य जनता, गुमान देशातले सर्वच राज्यसरकरे पंख छाटलेल्या कबुतराप्रमाणे या जोडगोळीचे गुलाम झालेला हा 2024 मधला आमचा, गुलामांचा भारत देश..!

       मेरा भारत महान नव्हे तर आता मेरा भारत गहाण म्हणून नवे गीत आम्ही गर्वाने गाऊ……

      व्वा रे देशा……..

   व्वा रे तुझी लोकशाही…….

  व्वा रे तुझी सुशिक्षितांची षंढ फौज…….

   व्वा रे तुझी अव्यस्थित बनलेली गुलाम व्यवस्था…..

धिक्कार तुमचा सर्वांचा…….

    सलाम जनतेच्या अन्याय सहन करणाऱ्या सहनशक्तीला…..

   कधीतरी आम्ही ( जनता ) अंतर्मुख होऊन विचार करणार आहोत की नाही….?

        गेल्या दहा वर्षात जगात आमचा देश मानवी हक्काचे उल्लंघन करण्यात सर्वात पुढे ( उदाहरण म्हणून,मणिपूर प्रकरण आणि 750 च्यावर शेतकऱ्यांच्या हत्त्या )…….!

       गेल्या दहा वर्षात आमच्या देशावरील जागतिक आणि देशांतर्गत कर्जाचा वाढता चढता आलेख…….!

        गेल्या दहा वर्षात लोकशाही असतांना,विरोधकांना निलंबित करून आपल्या सोयीचे कायदे बनविण्याचा सरकारचा अट्टाहास……….!

        गेल्या दहा वर्षात एकही पत्रकार परिषद न घेता कोणत्याही इतर केंद्रीय मंत्र्याला कोणतेही स्वातंत्र्य न देता केवळ आम्हीच दोघे या देशाचे उद्धारकर्ते समजून हुकूमशाहीच्या दावणीला देशाला बांधण्याचा प्रयत्न………!

     जनतेच्या मताचा अनादर करणाऱ्या EVM च्या विरोधातील जनतेची आणि वकील संघाची आंदोलने दडपवणे, त्यांना प्रसिद्धी न देणे……….!

       गेल्या दहा वर्षात चौथा आधारस्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांना आपले गुलाम बनवणे, त्यांचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती संपवून टाकली………!

    आणि आता टेकू घेतलेल्या छोट्या दोन पक्षांच्या नेत्यांना आपले कूटनितीने गुलाम बनवणे……….!

   असं एवढं असतांना तिसऱ्यांदा पुन्हा त्याच जोडगोळीचे सरकार येणे……….

         म्हणजे निदान माझ्यासाठी तरी……

     लोकशाहीसाठी, संविधानासाठी ही निश्चितच धोक्याची घंटा आहे. असं प्रत्येकाने समजून कामाला आज, आता, ताबडतोब पासून कामाला लागावं….

मी तर लागणार…….

मग ते वयक्तिक असो किंवा सार्वजनिक पातळीवर असो………

तुम्ही…….?

कारण हा देश माझा आहें.

        ही लोकशाही,संविधान,देश टिकविण्याची जबाबदारी आणि कर्तव्य माझेच आहे.

         कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली संसदीय लोकशाहीची आगेकूच ही अध्यक्षीय पद्धतीकडून हुकूमशाहीकडे करताना दिसते म्हणून….

         हे कर्तव्य माझे आहें की, यासाठी जे करता येईल ते ते सर्व करणे….

           जागृतीचा लेखक

              अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689..