मुख्यमंत्री/उप मुख्यमंत्री लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार…

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

गडचिरोली,(जिमाका)दि.12: गडचिरोली जिल्ह्यातील सर्व रेशनकार्डधारकांना सुचित करण्यात येते की, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी मा. मुख्यमंत्री/मा.उप मुख्यमंत्री/मा.मंत्री (अ.ना.पु.व ग्रा.सं.) दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 4.30 वाजता लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. सदर कार्यक्रमाचे सर्वसाधारण स्वरुप पुढील प्रमाणे आहेत. पात्र शिधा पत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा संचाचे वाटपाबाबत प्रतिक्रिया जाणून घेणे. राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी (बोनस)बाबत प्रतिक्रिया जाणून घेणे. शिवभोजन थाळी योजनेबाबत प्रतिक्रिया जाणून घेणे. 

उपरोक्त योजनांचा लाभ घेत असलेले 50 लाभार्थी जिल्हाधिकारी, गडचिरोली येथील NIC च्या Video Condrernce केंद्रात उपस्थित राहतील. जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी देखील सदर प्रसंगी उपस्थित राहतील. लाभार्थ्यांपैकी निवडक लाभार्थ्यांशी  मुख्यमंत्री/ उप मुख्यमंत्री महोदय संवाद साधतील असे जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.