धानोरा /भाविक करमनकर
जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथे आज दिनांक 29/6/2022 रोजी वर्ग 5 ते 12 मध्ये प्रवेशित नवोदित विद्यार्थ्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक डी. टी. कोहाडे सर प्रमुख अतिथी धामणे साहेब प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली, वी. आर. अरवेली गटशिक्षणाधिकारी प.स. धानोरा, होते. कार्यक्रमाची सुरवात बँड पथकाद्वारे नवोदित विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात आले.विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तसेच पुस्तके माननीय शिक्षणाधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी यांचे शुभहस्ते वाटप करण्यात आले.
कोरोना मुळे शिक्षणात जी दरी निर्माण झाली,अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही, त्यासाठी नवीन सत्रामध्ये सेतू अभ्यासक्रम यशस्वी रित्या राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना भावी जीवनात यशस्वी होणारे मार्गदर्शन करून आदर्श विद्यार्थी घडविण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी महोदयांनी सर्व शिक्षकांना केले. नवीन आलेल्या विद्यार्थ्यांनी गीतगायन केले तसेच एकल नृत्य सादर केले .कार्यक्रमाचे संचालन पी. बी. तोटावार यांनी केले तर आभार प्रदर्शन पी.वी.साळवे यांनी केले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डोके मॅडम कोल्हटकर सर, बुरमवार सर, देवकाते सर,रत्नागिरी सर, बादल वारघंटीवार ,रजनी मॅडम, कोरेवार मॅडम, निनावे मॅडम,सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.