चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
भंडारा(साकोली):- तालुक्यातील एकमेव मुलींची शाळा ओळखल्या जाणाऱ्या कलाबाई कन्या विद्यालयात या वर्षी प्रवेश घेणाऱ्या नव विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.
शैक्षणिक सत्र २०२२-२३ या वर्षाच्या शाळा २९जून पासून सुरू झाले, असून साकोली येथील एकमेव मुलींची शाळा असलेली कलाबाई कन्या विद्यालय येथे या सत्रात वर्ग ५ ते १२पर्यंत नव्यानं प्रवेश करणाऱ्या विद्यार्थिनींचे मोठ्या उत्साहात पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच विद्यार्थिनींना पुस्तके वाटप करण्यात आले.
यावेळी,अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्यध्यापक हे तर प्रमुख पाहुणे म्हणून रमेश भाजीपाले(पालक) उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन राखडे मॅडम यांनी तर आभार झिंगरे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इसापुरे सर, हत्तीमारे सर, भुरे मॅडम, गोमासे मॅडम,राऊत मॅडम तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी वलथरे,भुरे यांनी अथक प्रयत्न केले.