वणी : परशुराम पोटे
वणी पंचातय समिती अंतर्गत येणाऱ्या मानकी येथे जि.प.उच्च प्रा.शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा कार्यक्रम दि.२९ जुन बुधवारी साजरा करण्यात आला.
तत्पूर्वी या कार्यक्रमांची प्रभात फेरी, लेझिम नृत्य घोषणा मेळावा कार्यक्रमाचे उदघाटन, प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय काकडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष परशुराम पोटे व शालेय व्यवस्थापन चे सदस्य अनिल ठेंगणे, पोलीस पाटील सौ.मिनाक्षी मिलमिले यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक परसावार यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे फुलगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, त्याच प्रमाणे स्वागतगीत प्रमुख अतिथी स्वागत प्रास्तविक आनंदमयी शेक्षणिक गीत त्याचप्रमाणे स्टॉल लावून मुलांना विविध प्रकरची माहिती देण्यात आली.
शाळेत नव्याने पहिलीत येणाऱ्या विद्याथ्यांचे ओक्षण केले, शाळा पूर्व तयारी नुसार विद्याथी कडून कृती करून घेण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद पाटील यांनी तर आभार प्रदर्शन रामटेके यांनी केले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शाळेतील शिक्षक वर्ग कैलास कुळमेथे, रोहिणी मोहितकर, अंगणवाडी सेविका बेबीताई मालेकर, मदतनिस सुनिता पत्रकार, विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.