पंकज चहांदे

दखल न्यूज भारत

 

देसाईगंज – केंद्र शासनाने सैन्य भरतीसाठी आणलेली अग्निपथ ही योजना सैन्यात कंत्राटी पद्धत लागु करणारी असुन केवळ चार वर्षाची सेवा करून तरुणांना परत बेरोजगारीच्या खाईत ढकलणारी आहे. या विरोधात संपुर्ण देशभरातील सैनिक होण्याचे स्वप्न पाहणारे युवक स्वप्न भंग झाल्याने रस्त्यावर उतरले असतानाच त्यांच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतिनेही रस्त्यावर उतरून विरोधात जोरदार निदर्शने करत सदर योजना तत्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. 

     लष्करी सेवेत भरती होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या धाडसी तरुणांच्या भवितव्याशी केंद्रातील बीजेपी सरकारने खेळ मांडला आहे. केंद्र सरकारने ही योजना चार वर्षाकरीता आणली यावरुन तरुणांना परत वाऱ्यावर सोडुन देणारी आहे. ऐन उमेदिच्या काळात उघड्यावर सोडून देणे हा त्यांचा अपमान करणे असल्याचा आरोप तालुका काँग्रेस कमिटीच्या वतिने करण्यात आला आहे.

    दरम्यान चार वर्षाच्या सेवेनंतर या अग्निवीरांना भाजप कार्यालयात चौकीदाराची नोकरी देऊ असे विधान भाजपाच्या नेत्यांनी केल्याने हे सरासर सैनिकांचे मनोबल खच्ची करणारे आहे. यातुनच भाजपाचे जवानांबद्दलचे बेगडी प्रेम दिसुन येत असुन देशसेवा करणाऱ्या जवानांचा अपमान कदापी सहन केल्या जाणार नाही. यास्तव युवकांच्या रास्त न्याय मागण्यांना घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभरात जोरदार निदर्शने करुन सदर योजना तत्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात येत असतानाच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार देसाईगंज येथेही तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष परसराम टिकले यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरून विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

      यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव नामदेव किरसान, जिल्हा उपाध्यक्ष नंदुभाऊ नरोटे, शहराध्यक्ष आरिफ खानानी, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिंकु बावणे, ओबीसी संघटक तथा प्रदेश सचिव राजेंद्र बुल्ले, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष लतीफ रिजवी, माजी नगरसेवक जमाल शेख, माजी नगरसेवक हरीश मोटवानी, सागर वाढई, नरेन्द्र गजपुरे, संजय बन्सोड, क्षीरसागर शेंडे, भूमीत मोगरे,सुनील चिंचोळकर, कैलाश बन्सोड, नरेश लिंगायत, तेजस, मरसकोल्हे, शहरअध्यक्षा यामीना कोसरे, माजी नगरसेवक निलोफर शेख, पुष्पा कोहपरे, शोभा गेडाम, पदमा कोडापे, विमल मेश्राम, मंदा पेंद्रे, रजनी आत्राम, शंकर ढोरे, भीमराव नगराळे, लक्ष्मी बन्सोड आदी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com