सावली (सुधाकर दुधे)
म. रा. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ हे केवळ कर्मचाऱ्यांचे संगठन नसून कर्मचाऱ्यासोबतच समाजातील दुर्बल घटकांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध पेटून उठून समाजाला त्यांच्या हक्क व अधिकाराप्रति नेहमी जागृत करून अविरत समाजकार्य करणारी ही समग्र चळवळ आहे म्हणून कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या सर्व सभासदांनी समाजाभिमुख अभिनव उपक्रमाचेही सातत्याने आयोजन करून समाजजागृती चे काम अविरतपणे करत राहावे असे प्रतिपादन कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे चे केंद्रीय अध्यक्ष मा. अरुण गाडे साहेब यांनी व्यक्त केले. ते चंद्रपूर जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनपर सभेत बोलत होते.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने आतापर्यंत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांबाबत शासन, प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रसंगी आंदोलने उभारून लढा दिलेला आहे. नुकत्याच प्रमोशन मध्ये आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मुंबई येथे धरणे व मोर्चे यांचे नियोजन करून संपूर्ण महाराष्ट्राचा प्रत्येक जिल्हा काचेरीवरही मोर्चे काढले आहेत. जिथे अन्याय तिथे कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ अस जणू संघर्षाचं समीकरणच संघटनेनं निर्माण केलेलं आहे. आशा संघर्षात कल्याण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मॅन अपमानाची तमा न बाळगता आपलं दायित्व म्हणून संघटनेच्या संघर्षात स्वतःला झोकून द्यावं असंही ते म्हणाले.
जिल्हा कार्यकारणीच्या सभेत त्यांनी सिंदेवाही येथील मा. अरुण खराते यांची जिल्हाध्यक्ष, मा. जगदीप दुधे यांची जिल्हामहासचिव, कु. शुभांगी टोंगे यांची जिल्हा कार्याध्यक्ष तर नागपूर विभागीय अध्यक्ष म्हणून मा. यशवंत माटे ब्रम्हपुरी व केंद्रीय सहसचिव म्हणून मा. कविता मडावी राजुरा यांची निवड केली.
सभेला केंद्रीय अध्यक्ष अरूण गाडे, केंद्रीय प्रसिद्धी प्रमुख मा. सीताराम राठोड, केंद्रीय सहसचिव मा. कविता मडावी, विभागीय अध्यक्ष मा. यशवंत माटे, जिल्हाध्यक्ष मा. अरुण खराते, जिल्हामहासचिव म. जगदीप दुधे, कार्याध्यक्ष मा. शुभांगी टोंगे, माजी जिल्हाध्यक्ष मा. शंकर मसराम, दीपक मोटघरे, एम इ खोब्रागडे, संदेश मानकर, चंद्रशेखर मेश्राम, सुनील निमगडे, सुरेश राऊत, राज्य सहसचिव किशोर नागदेवते, मा. पाटील सर व संघटनेच्या अनेक सेल चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मा. चहांडे सर सिंदेवाही तालुकाध्यक्ष, प्रास्ताविक यशवंत माटे विभागीय अध्यक्ष तर आभार प्रदर्शन शंकर मसराम माजी जिल्हाध्यक्ष यांनी केले