सावली (सुधाकर दुधे)
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्याची जिल्हा कार्यकारिणी निवड सभा केंद्रीय अध्यक्ष मा. अरुण गाडे साहेब , मा. सीताराम राठोड,राज्य सहसचिव मा. किशोर नागदेवते,केंद्रीय सहसचिव मा. कविता मडावी, विभागीय अध्यक्ष मा. यशवंत माटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच पार पडली. संघटनेच्या अहवाल वाचनानंतर व सर्व तालुक्यांच्या आढाव्यानंतर जिल्हा कार्यकारिणी निवडीवर सर्वव्यापी चर्चा करण्यात आली.
त्यात जिल्हाध्यक्ष पदी मा. अरुण खराते सिंदेवाही, जिल्हा महासचिव पदी मा. जगदीप दुधे मूल आणि जिल्हा कार्याध्यक्ष पदी कु. शुभांगी टोंगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उर्वरित रिक्त पदे निवडीचे अधिकार नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मा. अरुण खराते यांना देण्यात आले. संघटनेची मुख्यालय शाखा वगळता आरोग्य, परिचर, अपंग (दिव्यांग)व अनुकंपा या सेलची कार्यकारिणी कायम ठेवून खालीलप्रमाणे जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
अतिरिक्त महासचिव – मा.निलेश जीवने , कोषाध्यक्ष- मा. शंकर मसराम , जिल्हा संघटक – मा.देवराव नगराळे, जेष्ठ उपाध्यक्ष- मा. अजय डोर्लीकर लेखाधिकारी चिमूर, उपाध्यक्ष- सौ.हर्षना बागडे ग्रामसेवक ब्रम्हपुरी, मा. सतीश कौरासे चंद्रपूर, मा. अतुल महाजन चिमूर, मा. बंडू खोब्रागडे नागभीड, मा. प्रेमकुमार खोब्रागडे सिंदेवाही, मा.प्यारेलाल गेडाम मूल, मा. कुणाल ढवळे , मा. डॅनिअल देवगडे सावली, मा. तुकडू अलाम पोंभुर्णा, मुख्यालय शाखा अध्यक्ष- मा. सुवर्णा सुखदेवे, सहसचिव- मा. निखिल ठमके वरोरा, मा.प्रवीण रायपुरे भद्रावती, प्रसिद्धी प्रमुख- मा. विद्या कोसे मूल, मा. प्रशांत कऱ्हाडे भद्रावती, जिल्हा महिला प्रतिनिधी- मा. संगीता मानकर सावली, कार्यालयीन सचिव – मा. संजीवनी खोब्रागडे चंद्रपूर, मुख्य सल्लागार- मा. एम. ई. खोब्रागडे ब्रम्हपुरी, मा. देवराव राठोड कोरपना, मा. दिवाकर मडावी राजुरा, मा. दीपक मोटघरे सिंदेवाही, महिला उपाध्यक्ष- मा .विजया वाघमारे, मा. चंदा तुरे सिंदेवाही, शिक्षक सेल अध्यक्ष- मा. चंद्रशेखर मेश्राम ब्रम्हपुरी, महासचिव- मा. सुनील निमगडे मूल, आशा वर्कर – मा. करुणा चहांदे, नर्सेस संघटना- मा. सौ. मेश्राम ब्रम्हपुरी, ओबीसी सेल- मा. राजू बरडे माजी मुख्या.
याप्रमाणे जिल्हा कार्यकारिणी विस्तार करण्यात आला .