प्रतिनिधी : मुंबई.

 

मुंबई : सर्वांचा उत्साहाचा आणि श्रद्धेचा असणारा सण गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा झाला. या वर्षी मात्र धूमधडाक्यातच साजरा होणार आहे. बाप्पाच्या मूर्तीची उंची आणि नियमांचे बंधन राहणार नाही. मात्र मूर्ती पर्यावरणपूरकच राहणार आहे. याबाबत शिवसेना आणि गणेशोत्सव समन्वय समितीसोबतच्या झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेला गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर आला असून मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. मात्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मे 2020 मध्ये ‘पीओपी’च्या मूर्तींवर बंदी घालण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या असल्यामुळे पर्यावरणपूरक आणि शाडूच्या मातीची मूर्ती बनवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबईत 12 हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व दोन लाख घरगुती मूर्तीपैकी 20 टक्के गणेश मंडळे व 60 टक्के घरगुती मूर्ती दोन वर्षांपासून टप्प्याटप्प्याने शाडू किंवा कागदाला प्राधान्य देत असल्याचे गणेशोत्सव समितीचे म्हणणे आहे.

            प्लास्टर ऑफ पॅरिस-पीओपीच्या मूर्ती बनवण्यावर आणि त्या वापरण्यावर राष्ट्रीय हरित न्यायधिकरण तसंच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बंदीविरोधात दाखल याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही हरित न्यायधिकरणाचा निर्णय योग्य ठरवलेला आहे, त्यामुळे आपण हे प्रकरण नव्याने ऐकू शकत नाही, असं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१० मध्ये पीओपीचा वापर न करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली होती. २०२० मध्ये सुधारित मार्गदर्शक तत्त्वं जाहीर करत गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात पीओपीच्या मूर्ती बनवण्यावर आणि त्या वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

 

दखल न्यूज भारत.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com