तालुका काँग्रेस कमिटीचा उपविभागीय अभियंता म. रा. वि. वि. कंपनी, चिमूरवर धडक मोर्चा…

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

        उन्हाळा सुरु असून चिमूर तालुक्यात अनेक दिवसापासून रात्र दिवस खंडित विज पुरवठा होत असल्यामुळे तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवलेली असून त्याना पिण्यायोग्य पाणी मिळत नसल्यामूळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होत आहे.

           तसेच लहान मुले व जनतेला उष्णतेच्या लाटेमुळे राहणे कठीन झाले आहे. लहान मुले झोपू शकत नाही. तसेच वयोवृद्ध लोकांच्या प्रकृतीवर परीणाम पडत आहे. रात्रीच्या वेळेसही विजेचा लपंडाव सुरु असल्यामुळे जनतेला फारच त्रास सहन करावा लागत आहे.चिमूर शहरात दिवसभरात दहा वेळा लाईट जात असते.

              कृपया चिमूर तालुक्यात ४ ते ५ दिवसापासून रात्रंदिवस होत असलेल्या खंडीत विज पुरवठ्यावर तात्काळ उपाय योजना करावी असा निवेदन राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ. सतिश वारजुकर यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आला.

            यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस गजानन बुटके, चिमूर तालुका अध्यक्ष डॉ. विजय गावंडे, जेष्ठ नेते विवेक कापसे, चिमूर विधानसभा युवक काँग्रेस रोशन ढोक, तालुका उपाध्यक्ष राजू चौधरी, माजी उपसभापती शांताराम सेलवटकर, जिल्हा महिला काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष सविता चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य भावना बावनकर, मोहिनकर ताई,माजी उपसभापती स्वप्नील मालके, सरपंच रामदास चौधरी, सरपंच भोजराज कामडी, सुधीर जुमडे, लटारू सूर्यवंशी, सुभाष करारे, रुपचंद शास्त्रकर,विलास मोहिनकर, पांडुरंग डोये,प्रमोद धाबेकर,मनोज खेटमाली,स्नेहल शंभरकर, श्रीकांत गेडाम व काँग्रेस पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते.