ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली – उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत सिंह हे ॲक्शन मोडवर असल्याने आता मात्र रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
29 मे ला सकाळी 07:00 वाजता दरम्यान सहाय्यक पोलीस अधीक्षक सुशांत सिंह यांच्या मार्गदर्शनात चमूने मौजा पालांदूर हद्दीतील वाकल गावाजवळ अवैधरित्या वाळू चोरीचे एक लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा सरपंच ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.36 ए.जी.2827 चालक सचिन घनश्याम वाघडकर वय 25वर्ष राहणार देवरी/गोंदी ता.लाखनी जि.भंडारा याचेवर गुन्हा दाखल करीत ट्रॅक्टर पालांदुर पोलीस स्टेशन येथे जमा केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालयीन चमूने अवैधरित्या विनापरवाना वाळू चोरीचे एक ट्रॅक्टर व टाली त्याची किंमत 4 लाख रुपये व त्यामध्ये मिळून आलेली एक ब्रास रेती 2,000/- रुपये असा एकूण 4 लाख 2,000/- रु. (चार लाख दोन हजार )रुपये चा माल असून चालक सचिन घनश्याम वाघडकर वय 25 वर्षे राहणार देवरी/गोंदी याचेवर पोलीस स्टेशन पालांदूर येथे कलम 379 भादवि सहकलम 130(1)/177 मोवा का प्रमाणे गुन्हा नोंद केला.
ही कार्यवाही सहाय्यक पोलीस अधीक्षक सुशांत सिंह यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार प्रदीप कुंभरे पोलीस नायक स्वप्निल गोस्वामी यांनी केली.