दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : येथील स्व. रामचंद्र भिसे (गुरुजी) वैद्यकिय प्रतिष्ठानच्या वतीने श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र पंढरपूर पालखी सोहळा २०२३ निमित्त आषाढी पायी वारीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळयातील सहभागी वारकऱ्यांसाठी ‘सोनिया गांधी फिरता मोफत दवाखाना’ ही सुविद्या उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय भिसे यांनी दिली आहे.
संत तुकाराम महाराज पालखीचे १० जूनला प्रस्थान देहू येथून होणार आहे. देहू ते पंढरपूर मार्गावर या पालखी सोहळ्यातील दिंडीतील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे. यावर्षी रुग्णवाहिका सेवा पुरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पालखी मार्गावर मोफत तपासणी व औषधोपचार करणाऱ्या विविध संस्थांनाही औषधांची मदत केली जाणार आहे.
या पथकात डॉ. अप्पा आटोळे, डॉ. योगेश पाटील, राजेंद्र गायकवाड सहभागी होणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. भिसे यांनी दिली.