छन्ना खोब्रागडे
विशेष प्रतिनिधी
श्री.साईनाथ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मालेवाडा येथे वर्ग बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थीयांचा सत्कार करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 98. 38 टक्के लागला.
त्यामध्ये प्रथम क्रमांकावर प्रतीक्षा राजेंद्र मोहूर्ले 76. 67 टक्के,द्वितीय हर्षाली गणेश नैताम 76. 50 टक्के तर तिसऱ्या क्रमांकावर कीर्ती सुरेश हिडामी हिला 72 टक्के प्राप्त झाले. या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांना पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.